राजा कायम राहणार का? पाऊस- पाणी कसा असणार? भेंडवळची भाकीतं जाहीर

bhendwal ghat mandani prediction 2023
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या बुलढाण्यातील ‘भेंडवळची घटमांडणी’चे भाकिते जाहीर झाली आहेत. गेल्या 350 वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला याठिकाणी देशातील पाऊस- पाणी, अर्थव्यवस्था, राजकीय घडामोडी यावर भाकिते केली जातात. त्यामुळे या घटमांडणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असतं. यावेळी सुद्धा भेंडवळच्या घटमांडणीने अनेक भाकिते केली आहेत. यंदाच्या भाकितानुसार, पाऊस चांगला होणार आहे तसेच यावर्षी पिके चांगली येण्याची भविष्यवाणीही वर्तवण्यात आली आहे.

चंद्रभान महाराज यांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांनी निरीक्षणे करून यंदाचा अंदाज जाहीर केला. या भाकितांनुसार, यंदा पाऊस चांगला असेल. जुलै आणि ऑगस्टमध्ये तर मोठ्या प्रमाणात पाऊस पडून अतिवृष्टी होईल असे भाकीत वर्तवण्यात आलं आहे. सप्टेंबर महिन्यात पाऊस थोडा कमी असेल परंतु अवकाळी पाऊस मात्र भरपूर होणार असून, पिकांचे नुकसान होईल असं या भाकितात म्हंटल आहे.

यावेळी पीक पाण्यासंबंधीचे अंदाज सुदधा वर्तवण्यात आले आहेत. यंदा पिकांवर रोगराई येईल, ज्वारी सर्वसाधारण राहिल, तूर पीक चांगले असेल, मूग, उडीद, तीळ , बाजरी पीक सर्वसाधारण असेल मात्र नासाडी होईल. तांदुळाचं चांगलं पीक येईल तसेच गव्हाचे सर्वसाधारण बाजार भाव तेजीत राहतील.

शेतकरी मित्रांनो, तुम्हांला हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, रोजचा बाजारभाव आणि शेतीविषयक सल्ले हवे असतील तर आजच मोबाईल मध्ये Hello Krushi हे अँप डाउनलोड करा. हॅलो कृषी मध्ये तुम्हांला शेतीशी संबंधित संपूर्ण माहिती १ रुपयाही खर्च न करता मिळत आहे. शेतीविषयक योजना, शेतीपूरक व्यवसाय, बी-बियाणे खरेदी विक्री, जैविक व सेंद्रिय खते, कृषी प्रक्रिया उद्योग, जमीन मोजणी, सातबारा उतारा यांसारख्या अनेक सुविधांचा लाभ तुम्ही अगदी फुकटात घेऊ शकता. त्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi हे अँप डाउनलोड करा.

हॅलो कृषी डाउनलोड करण्यासाठी Click Here

देशातील राजकीय परिस्थितीवर सुद्धा भेंडवळच्या घटमांडणीने भाकीत केलं आहे. देशाचा राजा कायम आहे, परंतु राजा कायम तणावात असेल. त्याला अडचणींचा सामना करावा लागेल. असं भाकीत वर्तवण्यात आलेलं नाही. राजकीय उलथापालथी या होतच राहतील . देशाच्या आर्थिक परिस्थितीत चढ उतार पहायला मिळतील परंतु शेजारील राष्ट्रे कायम कुरघोड्या करत राहतील अशीही भविष्यवाणी करण्यात आली आहे.