बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडेयेंनी काढली रिया चक्रवर्तीची लायकी, म्हणाले..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । सर्वोच्च न्यायालयानं अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवल्यानंतर बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडेय फारच जोशात आलेले दिसले. पत्रकारांशी बोलताना त्यांनी रिया चक्रवर्ती हिची ‘लायकी’ही काढली. यावेळी त्यांना रिया चक्रवर्तीसंबंधी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलातना मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर भाष्य करण्याची तिची लायकी नाही असं त्यांच्या म्हटलं. त्यांच्या या वक्तव्यावर पत्रकारांनी पुन्हा प्रश्न केला असता त्यांनी परत एकदा रिया चक्रवर्तीची लायकी नाही असा उल्लेख केला.

‘हा अन्यायाविरुद्ध विजय’ असल्याची तसंच ‘१३० कोटी लोकांच्या भावनांचा विजय’ पुष्टीही त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना जोडली. ‘न्यायालयाच्या या निर्णयामुळे सर्वोच्च न्यायालयाचा सन्मान आणखीनच वाढेल. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात निश्चित रुपात न्याय मिळेल, अशी आशा लोकांमध्ये निर्माण झालीय’ असं त्यांनी मीडियाशी बोलताना म्हटलं.

आमच्यावर आरोप लावण्यात येत होते की तुम्ही ही केस का घेतली? आम्हाला चौकशी करण्यापासून रोखण्यात येत होते. आम्ही आपला आयपीएस अधिकारी पाठवला तर त्याला एखाद्या कैद्याप्रमाणे रात्री १२ वाजता क्वारंटीन करण्यात आलं. तेव्हाच काही ना काहीतरी गडबड असल्याचं ध्यानात आलं होतं. आम्ही जी काही कारवाई केली ती कायदेशीररित्या योग्य पद्धतीनं केली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानं यावरच शिक्कामोर्तब केलंय. मी लोकांना आवाहन करतो की त्यांनी धैर्यानं प्रतिक्षा करावी’ असंही यावेळी गुप्तेश्वर पांडेय यांनी म्हटलं.

“मुंबई पोलिसांनी केलेला तपास अगदी चुकीचा आणि बेकायदेशीर होता. आम्ही करत असलेल्या तपासातून निकाल हाती येणारच. कारण ही फक्त एका व्यक्तीची, एका कुटुंबाची किंवा माझी वैयक्तिक लढाईनाही तर १३० कोटी जनता ज्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे त्यांची लढाई आहे,” असं गुप्तेश्वर पांडे यांनी म्हटलं आहे. सोबतच ‘बिहारच्या मुख्यमंत्र्यांवर कमेंट करण्याची रिया चक्रवर्तीची लायकी नाही’ या वाक्याचा पुनरुच्चार करतानाच त्यांनी ‘बिहारचे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच सुशांत न्याय मिळण्याची आशा दिसू लागलीय. सुशांत मृत्यू प्रकरण सीबीआयपर्यंत पोहचलं’ असंही त्यांनी म्हटलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”