भिलार ग्रामपंचायतीसमोरच स्थानिक धनदांडगा बेकायदा उत्खनन करतो; तलाठी मात्र उत्खननाची राखण करतो

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | महाबळेश्वर तालुक्यातील अस्तित्वहीन महसुल प्रशासनामुळे स्थानिक धनदांडग्यांनी राजकीय अन सामाजिक संस्थांची बिरुदं वापरुन ‘नाम बडे दर्शन खोटे’ करत भिलार ग्रामपंचायतीसमोर सर्वे नंबर ५६ मध्ये बेकायदा उत्खननाचं भलं मोठ भगदाड पाडलं आहे. ग्रामपंचायतीच्या समोर हाकेच्या अंतरावरील तलाठी कार्यालयाशेजारी बेकायदा उत्खनन सुरु असताना तलाठी मात्र स्थानिकांच्या बेकायदा उत्खननाची राखण करत असल्याची अशी दयनीय अवस्था पहायला मिळत आहे. भिलार सज्जाच्या तलाठ्याच्या नाकर्तेपणामुळे याठिकाणची परिस्थिती अवघड झाली आहे.

भिलारमधील स्थानिक राजकीय पुढाऱ्यांनी अनधिकृत बांधकाम व बेकायदा उत्खननाला हातभार लावून भिलारचं नैसर्गिक वरदान लोप करण्याचा विडा उचलला आहे. सामाजिक कामाचा बुरखा घेवुन तहसिलदार व प्रांत यांना मॅनेज करत भिलारमध्ये दिवसाढवळ्या जमिनीचे लचके तोडण्याचा एकमेव उद्योग सुरु आहे. स्थानिकाने निसर्गाचे लचके तोडले तरी चालतील असा शिरस्ता भिलारमध्ये कायम झाला आहे. भिलारमधील बेकायदा उत्खनन सुरु असताना झाडाची मुळे आता दिसु लागली आहेत. बेकायदा उत्खननामुळे झाडांची कत्तल सुरु असल्याचा धक्कादायक प्रकारदेखील समोर आला आहे.

भिलार या गावातील सर्वे नंबर ५६ हा ग्रामपंचायतीसमोर व तलाठ्याच्या कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर आहे. भिलारचे तलाठी हे तहसिलदार व प्रांतांच्या आदेशावरून बेकायदा उत्खननाची राखण करतात की काय ? अशी चर्चा भिलारमध्ये होवु लागली आहे. महसुल प्रशासन तसेच तहसिलदार सुषमा पाटील व प्रांत संगीता चैागुले याच्या कालखंडात महाबळेश्वर तालुक्याचं निसर्गसौंदर्य स्थानिक धनदांडगे आणि राजकीय पुढाऱ्यांनी धुळीस मिळवलं आहे. महसुल विभागानेच आपली लाज सोडल्यामुळे भिलारमध्ये बेकायदा उत्खनन सुरु आहे हे मात्र निश्चित..!!

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

 

Leave a Comment