नवी दिल्ली | वर्षभरापूर्वी भीमा काेरेगाव येथे क्रांतीदिनी झालेल्या हिंसाचारावरुन देशभरात वातावरण तापलेले असताना आता भीम आर्मी संघटनेचे संस्थापक चंद्रशेखर आझाद उर्फ रावण महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान मुंबईसह महाराष्ट्रात आझाद यांच्या सलग चार जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे. ३० डिसेंबरला पुण्यातील कोरेगाव-भीमा येथे आझाद यांच्या जाहीरसभेचं आयोजन करण्यात आले ते कुठल्या मुद्यावर जनतेला संबोधित करणार, याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.
दरम्यान, ”भीमा-कोरेगाव आमच्यासाठी तीर्थस्थळ आहे. सभेसाठी जे स्थळ निश्चित करण्यात आले आहे तेथेच जाहीर सभा होणार. मात्र सभेमुळे येथील वातावरण खराब होऊ नये याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची आहे”, असे चंद्रशेखर आझाद यांनी ‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.
दरम्यान, मुंबईतील कार्यक्रमानंतर ३० डिसेंबर रोजी आझाद यांची जाहीर सभा पुण्यात भीमा कोरेगाव क्रांती सभा ते संबोधित करणार आहेत. तर ३१ डिसेंबर रोजी भीमा कोरेगाव येथील विजयीस्तंभाला अभिवादन करणार आहेत. लातूर येथे २ जानेवारी २०१९ रोजी तर अमरावती येथील सायन्सकोर मैदानावर ४ जानेवारीला अशा सलग चार सभा घेण्यात येणार आहेत अशी माहिती भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रमुख कांबळे यांनी दिली आहे.
दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.