कराड प्रतिनिधी | अक्षय पाटील
आदरणीय खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातुन कराड तालुक्यातील काले येथील काले बेंदमळा-धोंडेवाडी रस्ता सुधारणा करणे कामाचा भूमीपूजन समारंभ आज संपन्न झाला. श्रीनिवास पाटील यांचे सुपुत्र आणि राष्ट्रवादीच्या आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील यांच्या हस्ते हा भूमिपूजन सोहळा पार पडला. यावेळी कृष्णा सह.साखर कारखान्याचे संचालक श्री.दयानंद पाटील-भाऊ, सरपंच श्री.अल्ताफभाई मुल्ला, उपसरपंच श्री.पांडुरंग बिळास्कर, आदी मान्यवर उपस्थित होते.
काले ते बेंदमळा-धोंडेवाडी या दरम्यान हा दीड किलोमीटर रस्ता तयार होणार असून यासाठी खासदार श्रीनिवास पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा परिषदेच्या 30 :54 निधी अंतर्गत या रस्ता सुधारणेचे काम होणार आहे. आजसारंग पाटील यांच्या हस्ते या रस्त्याचे भूमिपूजन पार पडले. या रस्त्यामुळे दळणवळण आणि वाहतूक आणखी सोप्पी होणार असून नागरिकांची गैरसोय होणार नाही.
दरम्यान, या भूमिपूजन सोहळ्या वेळी कृष्णा सह.साखर कारखान्याचे संचालक श्री.दयानंद पाटील-भाऊ, सरपंच श्री.अल्ताफभाई मुल्ला, उपसरपंच श्री.पांडुरंग बिळास्कर, श्री.अरुण साठे, श्री.केशव पाटे, श्री.सचिन काकडे, श्री.पांडुरंग देसाई, श्री.नाना साळुंखे, श्री.पारस पाटील, श्री.विकास पाटील, अन्य पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.