भुवनेश्वर आयर्लंड विरुद्धच्या सामन्यात केला ‘हा’ विश्वविक्रम, अनेक दिग्गजांना टाकलं मागे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत आणि आयर्लंड यांच्यातील T20 मालिकेतील दोन सामन्यांच्या पहिल्या सामन्यात भारतानं आयर्लंडचा 7 गडी राखून पराभव करत मालिकेत 1-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. भारताने काल दीपक हुडा, इशान आणि हार्दिकच्या तुफान खेळीवर सामना जिंकला. कालच्या सामन्यात पावसाने मोठ्या प्रमाणात व्यत्यय आणला. पाऊस असल्यानं जवळपास अडीच तासानंतर सामना सुरू होण्यास उशीर झाला. यामुळे पंचानी षटके कापून सामना 12-12 षटकांचा केला. यावेळी सामना सुरु झाल्यानंतर पहिले फलंदाजी करताना आयर्लंडनं 12 षटकांत 4 गडी गमावून 108 धावा केल्या. हॅरीनं शानदार फलंदाजी करताना नाबाद 64 धावा केल्या. यानंतर भारताने 9.2 षटकांत तीन गडी गमावून 111 धावा करून हा सामना जिंकला. या सामन्यात भुवनेश्वर कुमारने (Bhuvneshwar Kumar) एक मोठा विश्वविक्रम केला आहे.

या मालिकेसाठी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) भारतीय संघाचा उपकर्णधार आहे. त्याने आयर्लंडच्या डावाच्या पहिल्याच षटकात विकेट घेऊन विश्वविक्रम केला आहे. भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पॉवरप्ले ओव्हरमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. त्यानं आयर्लंडविरुद्धच्या सामन्याच्या पहिल्याच षटकात आयर्लंडचा कर्णधार अँड्र्यू बालबर्नीला बोल्ड केलं. अँड्र्यू बालबर्नीला या सामन्यात खातेही खोलता आले नाही. T20 सामन्यातील पॉवरप्लेमध्ये भुवीची (Bhuvneshwar Kumar) ही 34वी विकेट होती. पॉवरप्ले ओव्हरमध्ये तो सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे.

दोन दिग्गजांना टाकले मागे
भुवनेश्वर कुमारने (Bhuvneshwar Kumar) पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत दोन खेळाडूंना मागे टाकले आहे. वेस्ट इंडिजचा लेगस्पिनर सॅम्युअल बद्रीनं टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्याच्या पॉवरप्लेमध्ये 33 विकेट घेतल्या आहेत तसेच न्यूझीलंडच्या टीम साऊदीने पॉवरप्लेमध्ये 33 विकेट्स घेतल्या आहेत. बांगलादेशच्या शाकिब अल हसनने 27 तर ऑस्ट्रेलियाच्या जोश हेझलवूडच्या नावावर 26 विकेट्स आहेत.

हे पण वाचा :
PNB ग्राहकांना आता चेक पेमेंटच्या एक दिवस आधी बँकेला द्यावी लागणार माहिती !!!

मुंबईच्या रस्त्यावर इलेक्ट्रिक स्कूटरपाठोपाठ इलेक्ट्रिक Tata Nexon EV कारने घेतला पेट

अखेर एकनाथ शिंदे भाजपा सोबत जाणार ? ‘हा’ व्हिडिओ आला समोर

शरद पवार ऍक्शन मोडमध्ये; राज्य सरकार बहुमत सिद्ध करेल

Bank of India ने लॉन्च केली 444 दिवसांची टर्म डिपॉझिट स्कीम !!!

Leave a Comment