व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

अखेर एकनाथ शिंदे भाजपा सोबत जाणार ? ‘हा’ व्हिडिओ आला समोर

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात राजकीय नाट्य घडत आहे. शिवसेनेचे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पक्षाच्या विरोधात बंड पुकारल्याने राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. त्यामुळे आता राज्यातील महाविकास आघाडीला धोका निर्माण झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या जनतेला मूर्ख बनवत ‘मी कोणत्याच पक्षासोबत गेलो नाही’ अस सांगणारे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीच आता राजकीय नाट्यावरून परदा उठविला असून जे सर्व घडल आणि सुरु आहे, त्यांच्या पाठीमागे भाजपचा हाथ असल्याचे आता समोर आले आहे.

बंडखोर आमदारांना संबोधित करताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजपा आपल्याला काहीच कमी पडू देणार नाही, भाजपा मोठी शक्ती आहे. काय करू शकते हे ते त्यांना समजावून सांगत आहे. यावेळी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे बंडखोर आमदारांचे गटनेते म्हणून निवडले गेले आहेत.

यावेळी बोलताना ते म्हणाले जे काही सुखदुःख आहे हे आपल्या सर्वांच एक आहे. जे असेल ते आपण एक जुटीने, किती काही होऊ द्या विजय आपलाच आहे. तुम्ही जे म्हणाला, ती नॅशनल पार्टी आहे ती महाशक्ती आहे. यावेळी पाकिस्तानचा सुद्धा उल्लेख केला गेला, त्यांनी मला सांगितले आहे, तुम्ही निर्णय घेतला हा देशातील ऐतेहासिक निर्णय आहे.

हे पण वाचा :
आई-वडिलांच्या प्रेमाची मुलीला मिळाली शिक्षा, नेमके काय घडले ?

सरकारकडून लवकरच ट्रान्सफर केले जाणार PF वरील व्याजाचे पैसे !!!

गुलामी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्णय घेऊ; राऊतांचे ट्विटद्वारे बंडखोर आमदारांना आवाहन

Cheteshwar Pujara ने भारतीय संघातील पुनरागमनाचे श्रेय रणजी ट्रॉफी-कौंटी क्रिकेटला दिले

अजित पवार कॉंग्रेस आमदारांनाही त्रास देत होते- नाना पटोले