व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

शरद पवार ऍक्शन मोडमध्ये; राज्य सरकार बहुमत सिद्ध करेल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडा मागे भाजपचाच हात आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. तरीही राज्यातील महाविकास आघाडी सरकार विधानसभेत बहुमत सिद्ध करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शरद पवार पत्रकार परिषदेत बोलत होते.

शरद पवार म्हणाले, एकनाथ शिंदे एका व्हिडिओ मध्ये म्हणत आहेत की आपल्यामागे एक राष्ट्रीय पक्षाची ताकद असून काहीही कमी पडणार नाही. आता तो राष्ट्रीय पक्ष कोण हे तुम्हाला सर्वाना माहीत आहे अस शरद पवार म्हणाले. सुरत, आसाममध्ये शिंदे गटाला मदत करणारी माणसे माझ्या परिचयाची आहेत असेही त्यांनी सांगितले.

गुवाहाटीला गेलेले आमदार परत मुंबईत आले की ते सांगतील आम्ही शिवसेनेसोबत आहे. त्यानंतर बहूमत कोणाच्या बाजूने आहे ते स्पष्ट होईल आणि पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकार आहे हे देशाला दिसेल, असंही शरद पवार म्हणाले

राज्यातील महाविकास आघाडीचा प्रयोग फसला का असा सवाल पत्रकारांनी केल्यानंतर पवार म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने गेल्या अडीच वर्षात अनेक चांगले निर्णय घेतले. कोरोना परिस्थिती उत्तमप्रकारे हाताळली. त्यामुळे हा प्रयोग फसला अस म्हणणे हा राजकीय अज्ञान आहे.