अजित पवारांच्या सहकार्यामुळे मिळालेल्या कोटीच्या विकासकामांचे भूमिपूजन महिलांच्या हस्ते संपन्न

सातारा | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्यातून आणि मेघाताई नलावडे यांच्या विशेष प्रयत्नातून साताऱ्यातील वाडे गावाच्या विकास कामांसाठी 1 कोटी 5 लाखाचा निधी मिळाला असून या कामाचे भूमिपूजन वाढे गावातील महिलांच्या हस्ते पार पडले. या मिळालेल्या निधीच्या माध्यमातून वाढे गाव तसेच वाडेश्वरनगर येथील अंतर्गत रस्ते बंदिस्त भुयारी गटार योजनेची कामे पूर्ण होणार आहेत.

या कार्यक्रमासाठी महिलांचा पुढाकार प्रामुख्याने दिसून आला ग्रामपंचायत सदस्य मेघा ताई नलावडे यांनी प्रास्ताविक करत असताना गावातील उपस्थित महिला बचत गट, आजी माजी सैनिक तसेच गावातील प्रसारमाध्यमांमध्ये कार्यरत असणाऱ्या सर्वांचा झाडाचे रोप देऊन सन्मान केला. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या माझा गाव माझा अभिमान हे समीकरण ज्यावेळेस आपण सर्वजण एकत्र येऊ त्यावेळेस लागू होईल आणि गावचा विकास होईल. सध्या गावात होणाऱ्या विकास कामांमध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड मी करणार नसल्याचे प्रतिपादन मेघाताई नलावडे यांनी केले आहे.

यावेळी किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मधुकर नलावडे यांनी या आणलेल्या निधीबाबत कोणतेही राजकारण न करता सर्वांनी एकत्र येऊन या होणाऱ्या विकास कामांमध्ये लक्ष घालावे असे आवाहन केले. याबरोबरच मेघाताई नलावडे यांच्या कार्याचे कौतुक करत यापुढील काळात पंचायत समिती, जिल्हा परिषदसाठी त्यांनी प्रयत्नशील रहावे.

You might also like