Monday, January 30, 2023

आबईचीवाडी येथे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या फंडातील सभामंडपाचे भूमीपूजन

- Advertisement -

कराड | गावच्या विकास कामासाठी सर्वाना एकत्रीत बरोबरीने घेऊन काम करावे. गावचा विकास हाच आमचा ध्यास आहे. खासदार श्रीनिवास पाटील यांनी नेहमीच लोकांच्या समस्या सुटण्यासाठी सामाजिक कार्याल प्राधान्य दिले आहे. तेव्हा सामाजिक कार्यात प्रत्येक गावाने हिरीहिरीने सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस सारंग पाटील यांनी केले.

आबईचीवाडी (ता. कराड) येथे सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या फंडातून उभारण्यात येणाऱ्या सभामंडप भूमीपूजन वेळी ते बोलत होते. यावेळी पाटणचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राजाभाऊ काळे, सह्याद्री कारखाना संचालक पांडुरंग चव्हाण, सरपंच अंकिता सुर्वे, उपसरपंच अशोक माने, ग्रामपंचायत सदस्य भगतसिंग महाडिक, दादासाहेब माने, किशोर जाधव ,सुरेखा काटकर, शितल कोकरे, मनिषा चव्हाण, रुपाली सुर्वे, अंकुश काटकर, तानाजी सुर्वे, सुनिल सुर्वे, दशरथ यडगे, बाबुराव नांगरे याची उपस्थिती होती.

- Advertisement -

सारंग पाटील म्हणाले, गटा तटाचे राजकारण बाजुला ठेवून गावच्या सर्वागिण विकासासाठी एकसंध व्हावे. गाव पुढे ठेवण्यात प्रत्येक नागरिकांचा सहभाग असणे महत्वाचे आहे. सभामंडप हे समाजाला एकत्रित आणण्याचे ठिकाण आहे. गावातील सण- उत्सव समाजाच्या हिताचे निर्णय हे सभामंडपात गावकरी घेत असतात. यावेळी राजभाऊ काळे, पांडुरंग चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत उपसरपंच अशोक माने यांनी केले. आभार सरपंच अंकिता सुर्वे यांनी मानले.