औरंगाबाद : कोरोना विषाणू प्रसाराला आळा घालण्यासाठी बनविण्यात आलेली प्रतिबंधात्मक लस पात्र व्यक्तींना अधिकाधिक प्रमाणात देण्यात यावी. यासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ तत्काळ उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी यांनी बिडकीन ग्रामीण रूग्णालयाच्या पाहणी दरम्यान दिली. यावेळी त्यांच्यासमवेत मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदवले उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले, दररोज किमान 100 नागरिकांचे लसीकरण करण्यात यावे, ग्रामीण रुग्णालयाची नवी इमारत कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवावी.
जुन्या इमारतीत कोवीड व्यतिरिक्त रुग्ण आणि गरोदर महिलांवर उपचार करण्यात यावेत. त्याचबरोबर जुन्या इमारतीत सुरू असलेले लसीकरण स्वतंत्र् अशा वेगळ्या ठिकाणी करण्यात यावे, अशा सूचना येथील आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांना दिल्या. कोरोना विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी प्रत्येकाने जनजागृतीवर भर द्यावा. रूग्णांना चांगली सुविधा, सेवा द्यावी, असे आवाहनही यावेळी जिल्हाधिकारी चव्हाण यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना केले.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्त्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा Whatsapp ग्रुप Join करा
Click here to Join our Whatsapp Group