Video: बिग बी-आयुषमानच्या ‘गुलाबो सिताबो’ सिनेमाचं पहिलं भन्नाट गाणं रिलीज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । बॉलिवूडचे शहेनशहा, बिग बी अमिताभ बच्चन आणि आयुषमान खुराना यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘गुलाबो सिताबो’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘गुलाबो सिताबो’च्या भन्नाट ट्रेलरनंतर आता सिनेमाचं पाहिलं गाणं रिलीज झालं आहे. या भन्नाट गाण्याच्या रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढली आहे. ‘जूतम फेंक’ असे या गाण्याचे बोल असून यात बिग बी आणि आयुषमान यांच्यातील भांडणाचे मजेशीर खटके दाखविण्यात आले आहेत.

शुजीत सरकार दिग्दर्शित याचित्रपटातलं ‘जूतम फेंक’ हे गाणं पीयूष मिश्रा यांनी गायलं आहे. तर पुनीत शर्मा यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. या चित्रपटात बिग बी ‘मिर्झा’ ही भूमिका साकारत असून ते घरमालक आहेत. तर ‘बांके’ म्हणजे आयुषमान खुराना त्यांचा भाडेकरु दाखविला आहे. काही दिवसापूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला.

या ट्रेलरमधून बिग बी आणि आयुषमान खुराना यांची जोडी मजेशीर अंदाजात पाहायला मिळाली. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने हे दोन्ही कलाकार पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करत आहेत. त्यामुळे या चित्रपटाविषयी प्रत्येकाला उत्सुकता आहे. त्यातच चित्रपटातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. दरम्यान, लॉकडाऊनमुळे ‘गुलाबो सिताबो’ चित्रपटगृहात नाही तर OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणारा बॉलिवूडचा पहिला चित्रपट ठरला आहे. १२ जूनला हा चित्रपट तुम्ही घर बसल्या पाहू शकता.

Jootam Phenk -Gulabo Sitabo| Amitabh Bachchan, Ayushmann Khurrana | Piyush, Abhishek, Puneet

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment