सांगली प्रतिनिधी | मिरज तालुक्यातील बेडग येथे असलेल्या मिशन हॉस्पिटलच्या शाखेमध्ये नर्स व महिला बचत गटामार्फत रुग्णांची फसवणूक करण्यात अली आहे. ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या योजनेचा बोगस अर्ज ग्रामस्थांकडून भरून घेवून त्यांच्याकडून ५० रूपांचे फॉर्म भरल्यानंतर २ लाख मिळणार असे सांगून फसवणूक केली जात होती.ग्रामस्थांना याबाबत संशय आल्याने ग्रामस्थांनी नर्स व बचत गटातील महिलांना धारेवर धरत हे काम बंद पाडले. या संदर्भात शासनाचे कोणतेही परिपत्रक नसल्याने एकच गोंधळ उडाला, ग्रामस्थांनी सर्व कागदपत्रे जप्त केली आहेत.
बेडग येथे मिशन हॉस्पिटलच्या शाखेमध्ये नर्स असणाऱ्या नाईक ह्या चैतन्य महिला बचत गट चालवत आहेत. त्यांच्या बचत गटामार्फत पंतप्रधान ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या बोगस अर्ज चार दिवसांपासून बेडगमध्ये भरून घेतले जात होते. ५० रूपयांमध्ये ८ ते ३२ वर्षे वयापर्यंतच्या मुलींचे नावे अर्ज भरून घेण्यात येत होते. अर्ज भरल्यानंतर २ लाख रूपये मिळणार म्हणून महिलांनी आतापर्यंत एकूण ५५० अर्ज भरले आहेत.
ग्रामपंचायत सदस्य उमेश पाटील, संभाजी पाटील आदि मान्यवर ग्रामस्थांनी याबाबत जाब विचारला. त्यावेळी बचत गटातील महिलांनी आम्हाला सांगलीतून फॉर्म दिले आहेत. आम्हाला फक्त फॉर्म भरून घ्या असे सांगितल्याने आम्ही फॉर्म भरून घेत असल्याचे त्यांनी सांगितले. याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी दोन महिलांना ताब्यात घेतले व त्यांच्याकडून फॉर्मबाबत माहिती घेतली असून याचा मुख्यसुत्रधाराचा पोलिस शोध घेत आहेत.
इतर महत्वाचे –
विशाल पाटील यांनी ठोकला लोकसभेसाठी शड्डू…
सांगलीत जिल्हा पोलीस प्रमुख आणि जिल्हाधिकारी यांनी केली रंगांची मुक्त उधळण…
मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याने… कोयना धरण प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन ४० व्या दिवशी स्थगित