भारताकडून चीनला पुन्हा एकदा मोठा झटका; शेकडो कोटींचं ‘हे” कंत्राट केलं रद्द

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | भारत आणि चीन यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. भारत चीन सीमेवर झालेल्या धुमश्चक्रीचे रूपांतर युद्धात होईल अशी भीती व्यक्त केली जात होती. त्यावेळी झालेल्या संघर्षात भारताचे २० जवान शाहिद झाले होते. तर चीनचे त्यावेळी ४३ जवान मारले गेले होते. त्यानंतर भारताने चीनला दणका देत चीनच्या ५९ नवीन अँप वर बंदी घालण्यात आली होती. व्यापार क्षेत्रात भारत चीनला नवीन धक्के देत आहे. भारतीय रेल्वे ने सुद्धा चीनला असाच एक मोठा धक्का दिला आहे. भारतीय रेल्वे मंत्रालयाने जाहीर केले कि , भारताने चिनी कंपन्यांना दिल गेलेलं ४७१ कोटी रुपयांचं कंत्राट रद्द करण्यात आलं आहे.

चिनी कंपन्यांचा कामाचा वेग कमी आहे असं कारण देत भारतीय रेल्वेनं चिनी कंपनीला देण्यात आलेलं ४७१ कोटी रूपयांचं कंत्राट रद्द केलं आहे. फ्रेट कॉरिडोअरच्या सिग्नल आणि दूरसंचार कामासाठी चिनी कंपनीला कंत्राट देण्यात आलं होत. परंतु तेही शुक्रवारी रेल्वेने रद्द केलं. कानपूर ते मुगलसराय दरम्यानच्या कॉरिडॉरच्या ४१७ किलोमीटर लांबीच्या मार्गावर हे काम होणार होते. ‘डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक अनुराग सचान यांनी हे कंत्राट रद्द करण्याचे पत्र दिल्याची माहिती दिली.

“ चिनी कंपन्यांनी आतापर्यंत भारतीय रेल्वे चे केवळ २० % काम पूर्ण केलं होतं. त्यामुळे दिवसेंदिवस कामाला उशीर होत आहे.जागतिक बँक या प्रकल्पासाठी वित्तपुरवठा करत आहे या वर्षी एप्रिल महिन्यात कंपनीला हे कंत्राट रद्द करण्यात येईल याची कल्पना देण्यात आली होती.जागतिक बँकेकडून एनओसी मिळालेली नाही. त्यामुळे आम्ही त्यांना कंत्राट रद्द झाल्याची माहिती दिली असून त्यांना वित्तपुरवठा आम्हीच करणार असल्याचंही सांगितलं आहे,चीनी कंपन्यांना २०१६ मध्ये कंत्राट दिल गेल होत. ” असं सचान म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment