नवी दिल्ली । इन्फोसिसच्या गुंतवणूकदारांसाठी सोमवारची सुरुवात खुप खराब झाली आहे . आजचा बाजार उघडताच इन्फोसिसचे शेअर 9% पर्यंत घसरले. सकाळी 9.30 वाजता कंपनीचे शेअर 9% घसरून 1592 रुपयांवर ट्रेड करत होते. 23 मार्च 2020 नंतर इन्फोसिसच्या शेअर्समधील ही सर्वात मोठी घसरण आहे. मात्र थोड्याच वेळात हे शेअर्स सावरले. सकाळी 10.40 वाजता, इन्फोसिसचे शेअर्स 6.96% घसरून 1626.35 रुपयांवर ट्रेड करत होते. शेअर्सच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे काही मिनिटांत 40,000 कोटी रुपयांचे नुकसान झाले. सुरुवातीच्या ट्रेडिंगमध्ये, बीएसईवर इन्फोसिसची मार्केट कॅप 6,92,281 कोटी रुपयांनी घसरली होती.
कंपनीचे चौथ्या तिमाहीचे निकाल अपेक्षेपेक्षा कमकुवत होते, जे शेअर्सवर दिसून येत आहे. विश्लेषकांनी कंपनीच्या मार्जिन अंदाजात कपात केली आहे. जेफरीज इंडियाने इन्फोसिसचा मार्जिन अंदाज 1-1.7% पर्यंत कमी केला आहे. इन्फोसिसचे मार्जिन तिमाहीच्या आधारावर 1.93% घसरून 21.6% झाले. कामाचे दिवस कमी होणे हे त्यामागील प्रमुख कारण होते. याशिवाय, जास्त खर्च, कर्मचार्यांवर जास्त खर्च, प्रवास खर्चात झालेली वाढ यामुळेही कंपनीचे मार्जिन अपेक्षेपेक्षा कमी झाले आहे.
देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसने मार्च तिमाहीत निव्वळ नफ्यात 12% वाढ नोंदवून 5,686 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 5,076 कोटी रुपये होता. आर्थिक वर्ष 2022 च्या चौथ्या (जानेवारी-मार्च 2022) तिमाहीत, कंपनीचे उत्पन्न 23% ने वाढून 32,276 कोटी रुपये झाले. मागील वर्षीच्या याच तिमाहीत ते 26,311 कोटी रुपये होते.
कंपनीच्या पुढील कामगिरीबाबत मार्गदर्शन करताना असे म्हटले आहे की, आर्थिक वर्ष 2023 मध्ये कंपनीच्या कॉन्स्टेंट करेंसी रेवेन्यू ग्रोथ मध्ये 13 ते 15 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. CNBC-TV18 पोलने कॉन्स्टेंट करेंसी रेवेन्यू ग्रोथसाठी 12-14 टक्के मार्गदर्शनाचा अंदाज व्यक्त केला होता. त्याचप्रमाणे, कंपनीने पुढे असेही म्हटले आहे की, आर्थिक वर्ष 2023 मध्ये कंपनीचे मार्जिन 21-23 टक्के असू शकते. त्याच वेळी, CNBC-TV18 च्या सर्वेक्षणात हे मार्गदर्शन 22-24 टक्के असण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.”
पूर्ण आर्थिक वर्ष 2022 साठी, कंपनीच्या कॉन्स्टेंट करेंसी रेवेन्यू ग्रोथ मध्ये 19.7 टक्के वाढ झाली आहे, तर कंपनीने त्यांच्या मार्गदर्शनात 19.5-20 टक्के असा अंदाज व्यक्त केला होता. त्याचप्रमाणे, आर्थिक वर्ष 22 मध्ये, कंपनीचे मार्जिन 23 टक्के होते, तर कंपनीने आपल्या मार्गदर्शनात ते 22-24 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता. चौथ्या तिमाहीत, कंपनीला $2.3 अब्ज किंमतीच्या मोठ्या ऑर्डर मिळाल्या आहेत. या प्रसंगी बोलताना इन्फोसिसचे सीईओ म्हणाले की,” कंपनीने व्यापक-आधारित कामगिरीसह बाजारपेठेतील वाटा सतत वाढवण्यात यश मिळवले आहे आणि एका दशकातील सर्वोच्च वार्षिक वाढ गाठली आहे.”