Big Breaking News | आत्मनिर्भर भारतासाठी PM मोदींची 20 लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । कोरोना संकटाशी लढण्यासाठी केंद्र सरकारने १.७९ लाख कोटींची तरतूद केली होती. त्यामध्येच आज वाढ करत नरेंद्र मोदींनी एकूण २० लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा केली. हागणदारीमुक्त भारत, कुपोषणमुक्त भारत, स्वच्छ भारत, टीबीमुक्त भारत या गोष्टी जेव्हा भारत पुढे आणतो त्यावेळी जग भारताकडे अभिमानाने बघत असतो या जुन्याच पारंपरिक उदाहरणांचा दाखला मोदी यांनी यावेळी दिला.

गुलामगिरीतील भारत आता विकासाकडे निघाला असून या प्रवासातही भारताने विश्वकल्याणाचा मार्ग अवलंबला असल्याचं मोदी यावेळी म्हणाले. जगात ज्या गोष्टी सुधारण्यासाठी भारतीयांची गरज लागेल त्या गोष्टींसाठी भारत नेहमीच सज्ज राहील हे सांगत असताना नरेंद्र मोदींनी कच्छच्या भूकंपाची आठवण करुन दिली. संकटातून बाहेर पडायचा विचार केला तर आपण ते करुच शकतो याचा पुनरुच्चार नरेंद्र मोदींनी केला.

आत्मनिर्भर भारताची निर्मिती ५ मजबूत घटकांवर अवलंबून असून अर्थकारण, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, विविधता आणि मागणी हे ते घटक असल्याचं नरेंद्र मोदींनी स्पष्ट केलं.

-अर्थमंत्र्यांकडून या पॅकेजची सविस्तर माहिती दिली जाईल
– देशातील शेतकऱ्यांसाठी आणि उद्योगांसाठी हे आर्थिक पॅकेज आहे
-२० लाख कोटींचे हे पॅकेज आत्मनिर्भर भारतासाठी गती देईल
-२० लाख कोटी रुपयांचे हे पॅकेज आहे. भारताच्या जीडीपीच्या १० टक्के इतके आहे
-करोना संकटाचा सामना करण्यासाठी नवीन संकल्पानुसार विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा

PM Modi's address to the nation on COVID-19 related issues | May 12, 2020

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment