हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या लोकसभेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या लोकसभेच्या अधिवेशनात दळणवळण मंत्री असलेल्या अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की,” BSNL च्या पुनरुज्जीवनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून 1.64 लाख कोटी रुपयांच्या मेगा प्रोजेक्टला मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे आता भारतातील दूरसंचार क्षेत्राचा पूर्णपणे चेहरामोहराच बदलून जाणार आहे. दळणवळण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुढे सांगितले कि,” काही राजकीय पक्षांच्या धोरणांमुळे बीएसएनएलला मोठा फटका बसला आहे. त्यापैकी काही लोकं ही अजूनही खासदार आहेत. तसेच याचा वापर एखाद्या ‘दुभत्या गाई’सारखा करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
लवकरच लाँच होणार 4G आणि 5G
दळणवळण मंत्री पुढे म्हणाले की,” आता काळ बदलला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमा अंतर्गत BSNL आता लवकरच देशात डिझाइन केलेले, विकसित आणि तयार केलेले 4G आणि 5G नेटवर्क लॉन्च करणार आहे.” सभागृहातील विरोधी बाकांकडे इशारा करत म्हणाले की,” काही (माजी) मंत्र्यांनी BSNL चा दुभत्या गायीसारखा वापर करण्याची वेळ आता निघून गेली आहे.” असे सांगताना वैष्णव यांनी कोणत्याही व्यक्तीचे किंवा राजकीय पक्षाचे नाव मात्र घेतले नाही.
जगातील सर्वात स्वस्त मोबाईल डेटा सर्व्हिस भारतात उपलब्ध
दळणवळण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी असेही म्हंटले की,” सध्या जगातील सर्वात स्वस्त मोबाईल डेटा सर्व्हिस भारतात आहे. इथे 20 रुपयांपेक्षा कमी किंमतींमध्ये एक गिगाबाइट (GB) डेटा उपलब्ध आहे.” अश्विनी वैष्णव असेही म्हणाले की,”मागील सरकारच्या काळात ते सुमारे 200 रुपये होते. मात्र आता सेवा सुधारण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात असल्याचेही त्यांनी सांगितले. हे लक्षात घाई कि, सध्या BSNL आणि BBNL विलीनीकरण करून सेवा सुधारणे, स्पेक्ट्रम वाटप, बॅलन्सशीट कमी करणे आणि फायबर नेटवर्क वाढवण्यासाठी योजनांवर काम केले जात आहे.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.bsnl.co.in/
हे पण वाचा :
Kotak Mahindra Bank ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, 7 दिवसांत तिसऱ्यांदा FD वरील व्याजदरात केली वाढ
Train Cancelled : रेल्वेकडून आज 261 गाड्या रद्द !!! अशा प्रकारे तपासा रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट
Gold Price Today : सोने-चांदी झाले स्वस्त, आजचे दर तपासा
Railway Rules : रेल्वे प्रवाशांना ‘या’ वेळेपर्यंतच आहे झोपण्याची परवानगी, जाणून घ्या त्यासाठीचे नियम
LIC च्या ‘या’ पॉलिसी अंतर्गत मॅच्युरिटीवर मिळवा लाखोंचा फायदा