हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकार कडून सुरु करण्यात आलेल्या पीएम किसान सम्मान योजनेत अनेक शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन केले आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी 6 हजार रुपये जमा होतात. एकूण 3 हप्त्यामध्ये ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होते. आता शेतकरी पीएम किसानच्या 11 व्या हफ्त्याची वाट पाहत आहेत. मात्र यावेळी सरकारने यासाठीच्या काही नियमांमध्ये बदल केले आहेत. यासाठी शेतकऱ्यांना आपले काही डॉक्युमेंट्स अपडेट करावे लागतील अन्यथा त्यांचे खाते बनावट असल्याचे मानले जाईल आणि जर असे झाले तर त्यांना याआधी मिळालेले सर्व पैसेही सरकारला परत करावे लागतील.
या नवीन नियमांतर्गत शेतकऱ्यांना आपले ई-केवाईसी अपडेट करवाई लागतील. बनावट खाती ओळखण्यासाठी सरकारकडून हे पाऊल उचलले गेले आहे. आता शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत कि नाही हे पीएम किसान पोर्टलद्वारे पाहता येईल. जर ते पात्र नसतील तर याआधी मिळालेले पैसेही त्यांना परत करावे लागतील. या नियमांद्वारे असे सांगितले गेले आहे की शेतजमीन पती आणि पत्नी दोघांच्या नावाने असायला हवी. जर दोघेही सोबतच राहत असतील तर या योजनेचा लाभ फक्त एकालाच दिला जाईल. याच संदर्भात अनेक शेतकऱ्यांना नोटिस देखील जारी करण्यात आलेल्या आहेत.
जर आपण चुकीच्या पद्धतीने या योजनेसाठी पात्रता मिळवली असेल तर आपण पीएम किसान वेबसाइट जाऊन पैसे परत करू शकाल. यासाठी वेबसाइट वर जाऊन रिफंड ऑनलाइन क्लिक करावे लागेल. यानंतर आपल्या समोर 2 पर्याय दिसतील. जर पैसे दिले असतील तर चेक वर क्लिक करा. जर पैसे परत करायचे असतील तर आधार नंबर, मोबाइल नंबर, आणि बँक खात्याचे डिटेल्स टाकून डेटा रिक्वेस्ट करा. जर तुम्ही योजनेसाठी पात्र असाल तर ‘आपण रिफ़ंड साठी पात्र नाही’ असा मेसेज येईल नाहीतर तुम्हांला रिफंडची अमाउंट दिसून येईल.
वेबसाइट वर जाऊन स्टेटसमध्ये आरएफटी साइन्ड असे लिहिलेले असेल तर तुम्ही दिलेली माहिती चेक केली गेली आहे. जर स्टेटसमध्ये एफटीओ जनरेटेड आणि पेमेंड कंफर्मेशन पेंडिंग असे लिहिलेले असेल तर सरकारने तुमची माहिती कन्फर्म केली आहे.