सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा जिल्ह्यातील भुईंज येथील किसनवीर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी चे वाई मतदार संघाचे आमदार मकरंद पाटील आणि त्यांचे बंधू जिल्हामध्यवर्ती बँकेचे चेअरमन नितीन पाटील यांनी उडी घेतली आहे. दरम्यान आज मदन भोसले यांनी किसनवीर सहकारी साखर कारखाना अडचणीत आणण्यामध्ये वाईचे आ. मकरंद पाटील आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन नितीन पाटील या दोन बंधूंचाच हात असल्याचे गंभीर आरोप केला आहे.
मदन भोसले यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, वाई तालुक्याचे आमदार मकरंद पाटील आणि त्यांचे बंधू जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन नितीन पाटील या दोघांनी किसन वीर कारखाना अडचणीत कसा येईल याबाबत वेळोवेळी प्रयत्न केले. तसेच त्यांनी राज्य सहकारी बँकेकडून कर्ज मिळू नये यासाठी प्रयत्न केला आहे.
किरणवीर सहकारी साखर कारखाना नीट चालू नये यासाठी या मंडळींकडून गेली काही वर्षे प्रयत्न केले जात आहे. बऱ्याचदा राजकारण, निवडणुकीत सर्वांची नावे घेतल्याने अडचणी निर्माण होतात. प्रत्येक तालुक्यात परिस्थिती भिन्न भिन्न असते. तसे काही मी करणार नाही, कुणालाही अडचणीत आणण्याचे काम मी करणार नाही. मात्र, वाई तालुक्याचे आमदार व जिल्हा बँकेचे अध्यक्ष कशा प्रकारे अडचणीत येईल यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, मी त्यांना यश येऊ देणार नाही, असेही यावेळी मदन भोसले यांनी सांगितले.