Gold Price : सोन्या-चांदीच्या दरात आज मोठा बदल, विक्रमी पातळीपासून सोने 1000 रुपयांनी स्वस्त तर चांदी 4000 रुपयांनी महाग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोन्याच्या दरात आज गुरुवारी वाढ झाली आहे. गुरुवारी, 11 नोव्हेंबर रोजी, मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या किंमतीत 0.33% वाढ झाली आहे, म्हणजेच सोने 163.00 ने महागले आहे. यासह प्रति 10 ग्रॅम सोन्याचा भाव आज 49,017 रुपयांवर पोहोचला आहे. त्याचबरोबर आज चांदीही महागली आहे. चांदीचा भाव 175 रुपयांनी म्हणजेच 0.27 टक्क्यांनी वाढून 66053 रुपयांवर पोहोचला आहे.

सोने विक्रमी पातळीपेक्षा 1000 रुपयांनी स्वस्त आहे

गेल्या वर्षी 11 नोव्हेंबर रोजी MCX वर सोन्याचा भाव ₹50,259 वर होता. त्याच वेळी तो 62,097 रुपयांवर ट्रेड करत होता. त्यानुसार सध्या सोने केवळ 1000 रुपयांनी स्वस्त राहिले आहे. मात्र चांदीचा भाव सुमारे चार हजार रुपयांनी महागला आहे. लग्नाचा हंगाम सुरू होणार आहे, अशा परिस्थितीत सोन्या-चांदीचे वाढलेले दर सर्वसामान्यांसाठी अडचणीचे ठरू शकतात.

१० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४७,२६० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४६,९८० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६५,९०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे.
उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,300 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,540 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,260 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,260 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,260 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,260 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर करतात. Gold Rate Today आपल्याला हे माहिती हवे कि २२ कॅरेट सोन्यामध्ये ९१.६६ टक्के सोने असते. तसेच त्यात २ कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यास नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित ५ प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – ४७,२६० रुपये
पुणे – ४६,३०० रुपये
नागपूर – ४७,२६० रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – ४८,२६० रुपये
पुणर – ४९,५४० रुपये
नागपूत – ४८,२६० रुपये

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचे आजचे दर 

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4629.00 Rs 4628.00 -0.022 %⌄
8 GRAM Rs 37032 Rs 37024 -0.022 %⌄
10 GRAM Rs 46290 Rs 46280 -0.022 %⌄
100 GRAM Rs 462900 Rs 462800 -0.022 %⌄

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर 

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4953.00 Rs 4952.00 -0.02 %⌄
8 GRAM Rs 39624 Rs 39616 -0.02 %⌄
10 GRAM Rs 49530 Rs 49520 -0.02 %⌄
100 GRAM Rs 495300 Rs 495200 -0.02 %⌄

Leave a Comment