मोठा निर्णय ! पुढील ३ महिने लस आणि ऑक्सिजनच्या आयातीवरील कस्टम ड्युटी हटवणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली वृत्तसंस्था : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी देशात ऑक्सिजनच्या उपलब्धतेसंदर्भात उच्चस्तरीय बैठक घेतली. पुढील तीन महिन्यांपर्यंत लस, ऑक्सिजन, ऑक्सिजन संबंधित उपकरणांच्या आयातीवर मूलभूत कस्टम ड्युटी व आरोग्य सेस कर पुढील ३ महिन्यांसाठी तात्काळ पूर्णपणे हटवण्याचे निर्देश महसूल विभागाला दिले. पंतप्रधानांनी बैठकीत सांगितले की, “रुग्णालयांमध्ये वैद्यकीय ग्रेड ऑक्सिजनचा पुरवठा वाढवण्याची नितांत गरज आहे तसेच घर व रुग्णालयात रूग्णांच्या गरजा भागविण्यासाठी ऑक्सिजनशी संबंधित उपकरणाचीही मोठी गरज आहे”.

ऑक्सिजन व वैद्यकीय पुरवठ्यांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी पंतप्रधानांनी सर्व मंत्रालये व विभागांना एकत्र काम करण्याचे निर्देश दिले.ऑक्सिजन आणि ऑक्सिजन संबंधित उत्पादनांना मंजुरी देण्यासाठी तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश त्यांनी महसूल विभागाला दिले.कोविड -१९ लस आयातीवरील मूलभूत कस्टम ड्युटी रद्द करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. हा निर्णय पुढील तीन महिन्यांसाठी असेल.केंद्र सरकारने यासाठी नोडल अधिकारी नेमला आहे, या विषयाशी संबंधित गोष्टीकडे लक्ष देईल.आजच्या निर्णयामुळे ऑक्सिजन आणि लसची उपलब्धता सुनिश्चित करण्यात मदत होईल, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. यामुळे वस्तूंच्या किंमती कमी ठेवण्यास देखील मदत होईल.

दरम्यान देशात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोविशिल्ट आणि भारत बायोटेक-आयसीएमआरची कोव्हॉक्सिन लस तयार केलेल्या आहेत. याचे देशात लसीकरण कार्यक्रम चालू आहे. या दोन व्यतिरिक्त, केंद्र सरकारने रशियन लस स्पुतनिक-व्ही च्या आपत्कालीन वापरास मान्यता दिली आहे.

 

 

Leave a Comment