नवी दिल्ली । रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जुन्या वाहनांच्या फिटनेसबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत पुढील वर्षापासून सरकारने रजिस्टर्ड ऑटोमेटिक टेस्टिंग स्टेशनमधून वाहनांची फिटनेस टेस्ट घेणे बंधनकारक केले आहे. याशिवाय इतर कोणत्याही फिटनेस सेंटर्समधील फिटनेस व्हॅलिड असणार नाही. यासंदर्भात मंत्रालयाने अधिसूचना जारी करून वेगवेगळ्या वाहनांसाठी वेगवेगळी मुदत ठेवली आहे.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, जुन्या वाहनांना सरकारने मान्यता दिलेल्या ऑटोमेटिक टेस्टिंग स्टेशनमधून फिटनेस टेस्ट करावी लागेल. 1 एप्रिल 2023 पासून अवजड वाहने, अवजड प्रवासी वाहने आणि मध्यम भार असलेली वाहने तसेच प्रवासी वाहने आणि कमी वजनाची वाहने यांना 1 जून 2024 पासून सरकारी मान्यताप्राप्त ऑटोमेटिक टेस्टिंग स्टेशनमधून घेणे बंधनकारक असेल. वाहनांचे फिटनेस सर्टिफिकेट आठ वर्षांपेक्षा जुन्या वाहनांसाठी दोन वर्षांसाठी तर आठ वर्षांपेक्षा जुन्या वाहनांसाठी एक वर्षाचे असेल.
रस्ते वाहतूक मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत या संदर्भात जनतेकडून सूचना मागवण्यात आल्या आहेत. लोकांना 30 दिवसांत सूचना करण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. लोक आक्षेप आणि सूचना संयुक्त सचिव (परिवहन), रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, परिवहन भवन, संसद मार्ग, नवी दिल्ली-110001 यांना किंवा [email protected] या ईमेलद्वारे पाठवू शकतात.