तीन पानी जुगार अड्यावर तुफान राडा, ‘तेरी भी चुप.. मेरी भी चुप’ भूमिकेमुळे अद्याप पोलिसांत नोंद नाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

मिरजेतील स्टॅन्ड परिसरात सुरू असलेल्या तीन पानी जुगार अड्यावर तुफान राडा झाला असून मिरज आणि सांगली मधील दोघांमध्ये वाद झाला. या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. या हाणामारीत कोयता, काठ्यांचा सर्रास वापर करण्यात आला. एकावर शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहे.

शहर बस स्थानक हे गजबजलेले ठिकाण आहे. त्या ठिकाणी काही अंतरावर तीन पानी जुगार जोमात सुरू आहे. या जुगार अड्‌ड्यावर मिरज, सांगली आणि ग्रामीण भागातील ही काहीजण जुगार खेळण्यासाठी येतात. परंतु याची कुणकुण पोलिसांना नाही याचे मात्र आश्‍चर्य वाटत आहे. या जुगार अड्यावर मिरज आणि सांगली मधील काही तरूण जुगार खेळण्यासाठी आले होते. यामध्ये दोघांमध्ये वादावादी झाली. वादावादीचे पर्यावसन तुफान हाणामारीत झाली.

सांगलीतील तरूण व खॉजावस्ती येथील तरूण एकमेकांना भिडले. या हाणामारीत कोयता, खुरपे, काठ्या, दगडांचा वापर झाला. या हाणामारीत दोघे जखमी झाले. एकावर शासकीय रूग्णालयात तर एकावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. या हाणामारीची नोंद पोलिसात झाली नव्हती. या जुगार अड्यावरील तुफान हाणामारीची माहिती सर्वत्र पसरल्यानंतर सर्वांनीच तेरी बी चुप मेरी बी चुप ही भूमिका बजावल्यामुळे अद्यापही पोलिसांत याची नोंद झाली नाही.