हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोल्हापूर येथे होणारी सैन्य भरती कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे रद्द करण्यात आली आहे. याबाबत भारतीय सैन्य दलाच्या अधिकृत संकेतस्थळावर माहिती देण्यात आली आहे. सैन्य भरतीसाठी पश्चिम महाराष्ट्रासह कोकण व गोवा राज्यातील सैन्य भरतीचे अर्ज भरणाऱ्यांना या भरतीला मुकावे लागणार आहे.
कोल्हापूर येते पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग व गोव्यातील उत्तर व दक्षिण गोव्यातील युवकांची सैन्य भरती होणार होती. या भरतीत सैनिक जनरल ड्यूटी, सोल्जर टेक्निकल, सोल्जर क्लर्क / स्टोअर कीपर टेक्निकल, सोल्जर ट्रेड्समन, एचएव्ही एसव्ही ऑटो कार्टो (एसएसी), जेसीओ (आरटी) धार्मिक शिक्षक या पदासांठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते.
सैन्य भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची 20 फेब्रुवारी 2021 ही शेवटची तारीख होती. त्यामुळे भरतीसाठी मुलांनी अर्ज भरले होते. मात्र कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे कोल्हापूर येथे होणारी भरती कायमस्वरूपी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे आता या भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना नव्याने भरती निघाल्यानंतर पुन्हा अर्ज करावे लागणार आहेत कोरोनाने भरती रद्द झाल्याने पश्चिम महाराष्ट्रासह, कोकण व गोव्यातील तरूणांचे लष्करात भरतीचे स्वप्न लांबणीवर पडले आहे.
अधिकृत नोटीफिकेशन पहा- PDF (www.careernama.com)