गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! Vedanta Limited ची डिलिस्टिंग ऑफर झाली अयशस्वी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वेदांत लिमिटेडने भारतीय शेअर बाजारातील आपली लिस्टिंग समाप्त करण्यासाठी डिलिस्टिंग ऑफर (delisting offer) आणली आहे. अनिल अग्रवाल नियंत्रित या कंपनीची डिलिस्टिंग ऑफर अयशस्वी झाली. ही कंपनीची आता भारतीय शेअर बाजारात लिस्टेड (Listed) केली जाईल. कंपनीच्या भागधारकांसाठी हा एक मोठा विजय मानला जातो आहे. वेदान्त यांनी शनिवारी स्टॉक एक्स्चेंजला सांगितले की, कंपनीची डिलिस्टिंग ऑफर फेल ठरली आहे. यासंदर्भात रविवारी एक जाहिरात देण्यात येणार असून गुंतवणूकदारांना याची माहिती देण्यात येणार आहे.

वेदांत लिमिटेडला 125.47 कोटी शेअर्ससाठी बोली देण्यात आली आहे
स्टॉक एक्स्चेंजला देण्यात आलेल्या माहितीत वेदांत लिमिटेड म्हणाले आहेत की, कंपनीला 125.47 कोटी शेअर्ससाठी बिड मिळाल्या आहेत, तर शेअर बाजारातून डिलिस्ट (Delist) होण्यासाठी 134 कोटी शेअर्सची आवश्यकता आहे. या प्रकरणात, कंपनीची ही ऑफर फेल झाली. त्यानंतर कंपनीने बाजार नियामक सेबी (SEBI) कडून डिलिस्ट करण्यासाठी एक दिवसाची मुदत मागितली, परंतु त्यांना अतिरिक्त कालावधी नाकारला गेला. शुक्रवारी सेबीने डिलिस्टिंग ऑफरची वेळ संध्याकाळी सातपर्यंत वाढवली. वेदांताच्या प्रमोटरनी समभागधारकांच्या एकूण 169.73 कोटी समभागांपैकी 134 कोटी समभाग विकत घेतले असते, म्हणजेच कंपनीची लिस्टिंग शेअर बाजारातून संपली असती.

वेदांतला डिलिस्टिंगसाठी हवे होते 134.12 कोटी शेअर्स
वेदांत म्हणाले की, 5 ऑक्टोबरला ओपन बिडमधून 125.47 कोटी शेअर्ससाठी बिड मिळाल्या असून शुक्रवारी ते बंद झाले आहेत. या डिलिस्टिंगसाठी कंपनीला 134.12 कोटी समभागांची आवश्यकता होती. यानंतर,प्रमोटर्सची होल्डिंग 90 टक्क्यांहून अधिक झाली असती, जी सेबीच्या नियमांनुसार डिलिस्टिंग तयार करण्यासाठी आवश्यक होती. कंपनीने म्हटले आहे की ते लोकांकडून देऊ केलेले शेअर्स खरेदी करत नाहीत. म्हणून, कंपनी अद्याप स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्टेड केली जाईल. वेदांतच्या एकूण पेड अप शेअर्सची एकूण संख्या 356.10 कोटी आहे. त्यात 320.49 कोटी शेअर्सपैकी 90 टक्के हिस्सा होता. त्यापैकी 186.36 कोटी शेअर्सचे प्रमोटर्स मालक आहेत. त्याचबरोबर पब्लिकचे 169.73 कोटी शेअर्स आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.