SBI ग्राहकांसाठी मोठी बातमी, ‘या’ डिजिटल सर्व्हिसेस तीन दिवसांसाठी 120 मिनिटे बंद राहणार

0
47
Bank
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । जर तुम्ही देशातील सर्वात मोठी बँक SBI म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. बँकेने आपल्या खातेधारकांसाठी महत्त्वपूर्ण माहिती जारी केली आहे. वास्तविक, 9, 10 आणि 11 ऑक्टोबर रोजी बँकेच्या काही सर्व्हिसेसवर परिणाम होणार आहे. या काळात, ग्राहक काही काळासाठी इंटरनेट बँकिंग, योनो, योनो लाइट आणि UPI या सुविधेचा लाभ घेऊ शकणार नाहीत. SBI ने ट्विट करून ही माहिती दिली. अशा परिस्थितीत जर तुम्हाला कोणतेही महत्त्वाचे डिजिटल व्यवहार करायचे असतील तर ते लवकर पूर्ण करा.

आत्ताच नोंद करा
SBI बँकेने ट्वीट केले की, सिस्टीम मेन्टेनन्समुळे बँकेच्या काही सर्व्हिसेस 09, 10 आणि 11 ऑक्टोबर रोजी बंद राहतील. या सर्व्हिसेसमध्ये इंटरनेट बँकिंग, योनो, योनो लाइट आणि UPI सर्व्हिसेस यांचा समावेश असेल. 9 ऑक्टोबरच्या रात्री 12:20 ते 02:20 पर्यंत या सर्व्हिसेस बंद राहतील असे ट्विटमध्ये म्हटले आहे. 10 आणि 11 ऑक्टोबर रोजी रात्री 11:20 ते 1:20 पर्यंत या सर्व्हिसेस उपलब्ध होणार नाहीत.

यापूर्वीही बँकेने अनेक वेळा सर्व्हिसेस बंद केल्या आहेत.
SBI च्या कोणत्याही सर्व्हिसेसवर परिणाम होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 4 आणि 5 सप्टेंबर रोजी बँकेच्या काही सर्व्हिसेस बंद होत्या. 6-7 ऑगस्ट रोजी बँकेच्या काही सर्व्हिसेस देखील बंद होत्या. यापूर्वीही बँकेने 16 आणि 17 जुलै रोजी रात्री 10:45 ते 1.15 (150 मिनिटे) पर्यंत इंटरनेट बँकिंग, YONO, YONO लाइट आणि UPI सर्व्हिसेस बंद केल्या होत्या. इंटरनेट बँकिंग, योनो, यूपीआय आणि योनो लाइट सर्व्हिसेस 10 जुलै रोजी रात्री 10.45 ते 11 जुलै रोजी सकाळी 12.15 पर्यंत सिस्टीम मेन्टेनन्समुळे काम करत नव्हत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here