हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पोस्ट ऑफिसने देशभरातील पोस्ट ऑफिस अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत की, पीपीएफ (PPF), एनएससी, केव्हीपीसह पोस्ट ऑफिस कार्यालयातील सर्व लहान बचत योजनांचे क्लेम स्वीकारण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये साक्षीदारांची उपस्थिती आवश्यक नाही. यासाठी, काही डॉक्युमैंट दाखवून देखील काम होईल. पोस्ट ऑफिसने याबाबत असे म्हटले आहे की, साक्षीदारांचे ओळखपत्र व एड्रेस प्रूफ KYC मास्टर सर्कुलरने ठरवलेल्या फॉर्मेटमध्ये असावा.
या नवीन सर्कुलरनुसार, साक्षीदाराने स्वाक्षरी केलेले सेल्फ अटेस्टेड आयडी प्रूफ आणि एड्रेस प्रूफ क्लेम डॉक्यूमेंट जोडले असल्यास, पोस्ट ऑफिस क्लेम स्वीकारण्यास नकार देऊ शकत नाही.
पोस्ट ऑफिसने ही सूचना सर्व टपाल कार्यालयांना दिली आहे. या सर्कुलर मध्ये असे नमूद केले गेले आहे की, पीपीएफ किंवा इतर कोणत्याही लहान बचत योजनेसाठी मृत व्यक्तींचे क्लेम स्वीकारण्यासाठी टपाल कार्यालयातील अधिकारी दोन साक्षीदारांना पोस्ट ऑफिसमध्ये आणण्यास सांगत आहेत, अशी तक्रार पोस्ट ऑफिसकडे नॉमिनी / दावेदारांकडून येत आहे. हे लक्षात घेता टपाल विभागाने ही सूचना दिली आहे.
ओळखपत्रासाठीचे डॉक्यूमेंट्स
आधार कार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, फोटोकॉपी असलेले रेशन कार्ड, पोस्ट ऑफिस आयडी कार्ड, केंद्र सरकार व राज्य सरकारने दिलेली कोणतीही ओळखपत्र, मनरेगा जॉब कार्ड
ऍड्रेस प्रूफसाठीचे डॉक्यूमेंट्स
आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, फोटोसह रेशनकार्ड, केंद्र सरकार व राज्य शासनाने दिलेली कोणतीही ओळखपत्र ज्यावर पत्ता लिहिला असेल, ज्या कंपनीत ते काम करतात त्या कंपनीची सॅलरी स्लिप, नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर द्वारा जारी करण्यात आलेले लेटर त्यामद्ये नाव, पत्ता, वीज बिल,पाणी बिल, गॅस बिल इत्यादीची माहिती असेल, प्रॉपर्टी टॅक्स पावती, शासकीय किंवा मान्यताप्राप्त खासगी कंपनी व बँक यांनी दिलेला परवाना करार, टपाल कार्यालयाची पासबुक, बँक खात्याचे पासबुक, बँक खाते विवरण.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.