Samsung डिसेंबरपासून भारतात टेलिव्हिजन बनवण्यास करणार सुरवात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र । सॅमसंग इंडिया डिसेंबरपासून भारतात टेलिव्हिजन सेटचे उत्पादन सुरू करणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार सॅमसंगने सरकारला असेही सांगितले आहे की, जोपर्यंत ते भारतात टीव्ही निर्मिती सुरू करत नाही तोपर्यंत टीव्ही संच आयात करण्याची परवानगी देण्यात यावी. सॅमसंग ही सर्वात मोठी ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आहे. घरगुती उत्पादन वाढवण्यासाठी सरकारने गुरुवारी कलर टेलिव्हिजनच्या आयातीवर बंदी घातली. या निर्णयाचे उद्दीष्ट टीव्हीचे घरगुती उत्पादन वाढविणे आणि चीनसारख्या देशांकडून आवश्यक नसलेल्या वस्तूंची आयात कमी करणे हे आहे.

इंग्लिश बिझिनेस पेपर इकॉनॉमिक टाइम्सनुसार, सॅमसंगने 28 सप्टेंबर रोजी आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्री रविशंकर प्रसाद यांना एक पत्र लिहिले आहे. यात कंपनीने म्हटले आहे की, घरगुती टीव्ही निर्मितीची सुविधा उभारण्यासाठी सध्याची व्हॉल्यूमची मर्यादा खूप महत्वाची आहे. या उद्योगाशी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की, कंपनीने पंतप्रधान कार्यालय (पीएमओ) आणि विदेश व्यापार महासंचालनालयालाही पत्र लिहिले आहे. प्रतिसाद मिळावा यासाठी सॅमसंग इंडियाला पाठविलेले ई-मेल प्राप्त झाले नाही. ईटीने सॅमसंगनला लिहिलेले पत्र पाहिले आहे. 2018 मध्ये सॅमसंगने चेन्नई येथील आपला टेलिव्हिजन प्रोजेक्ट बंद केला, कारण सरकारने ओपन सेल टेलिव्हिजन पॅनेलवर आयात शुल्क लादले.

चीनकडून होणारी आयात कमी करणे आणि स्थानिक उत्पादनाला प्रोत्साहन देण्याच्या त्यांच्या धोरणाचा भाग म्हणून सरकारने 30 जुलै रोजी पहिल्यांदा 20 वर्षांच्या आयातीच्या निर्बंधित यादीमध्ये टीव्ही संचांचा समावेश केला. कंपन्यांना आता टीव्ही सेट आयात करण्यासाठी परवाना घेणे आवश्यक असेल. आतापर्यंत सरकारने असे कोणतेही परमिट जारी केलेले नाही.

रवीशंकर प्रसाद यांना लिहिलेल्या या पत्रात सॅमसंगने म्हटले आहे की, आयातीत अडथळे हे “व्यवसाय सहजतेच्या नीतिमत्तेच्या विरोधात आहे आणि कस्टममध्ये केलेल्या बदलामुळे आयात व्यवसायावर त्याचा परिणाम होत आहे. डिसेंबर 2020 पर्यंत आम्ही टीव्ही मॅन्युफॅक्चरिंग प्लॅन्टची स्थापना करीत आहोत, आम्ही सुरळीत ऑपरेशन आणि व्यवसायाच्या सातत्य ठेवण्याची विनंती करतो.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.