मद्यप्रेमींसाठी खुशखबर!! आता या महागड्या ब्रँडची दारू मिळणार सर्वात स्वस्त

0
4
Bourbon Whiskey
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मद्यप्रेमींसाठी एक महत्त्वाची बातमी नुकतीच समोर आली आहे. भारत सरकारने (Indian Government) बॉर्बन व्हिस्कीवरील (Bourbon Whiskey) आयात शुल्कात मोठी कपात जाहीर केली आहे. आता या अमेरिकन व्हिस्कीवर 150 टक्क्यांऐवजी केवळ 50 टक्के आयात शुल्क आकारले जाणार आहे. केंद्र सरकारने हा निर्णय अमेरिकेसोबत व्यापक व्यापार कराराबाबत वाटाघाटी सुरू असताना घेतला आहे.

सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यानच त्यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह द्विपक्षीय व्यापारासंबंधीत चर्चा झाली. या चर्चेनंतर अमेरिकन व्हिस्कीवर 50 टक्के आयात शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे भारतात अमेरिकन बॉर्बन व्हिस्की अधिक स्वस्त मिळणार आहे. मात्र, बॉर्बन व्हिस्की सोडून सरकारने इतर कोणत्याही आंतरराष्ट्रीय दारूच्या ब्रँडवरील आयात शुल्कात बदल केलेला नाही.

दरम्यान, अमेरिका हा भारताचा प्रमुख बॉर्बन व्हिस्की निर्यातदार आहे. २०२३-२४ मध्ये भारताने सुमारे २५ लाख डॉलर्स किमतीची बॉर्बन व्हिस्की अमेरिकेकडून आयात केली होती. अमेरिकेशिवाय यूएई आणि सिंगापूरमधूनही बॉर्बन व्हिस्की भारतात येते. मात्र भारताकडून अमेरिकन उत्पादनाला सर्वाधिक मागणी आहे. सध्या भारतात आयात होणाऱ्या दारूमधील २५ टक्के हिस्सा हा फक्त अमेरिकन व्हिस्कीचा आहे. त्यामुळे बॉर्बनच्या आयात शुल्कात सूट देण्यात आली आहे.

बॉर्बन व्हिस्की कशी बनते?

बॉर्बन व्हिस्की ही अमेरिकेतील सर्वांत प्रसिद्ध आणि जुनी व्हिस्की आहे. ती प्रामुख्याने मक्यापासून बनवली जाते. तिच्या उत्पादनासाठी ५१ टक्के मका आवश्यक असतो आणि ही व्हिस्की जळालेल्या ओक लाकडी पिपांत बनवली जाते. यामुळे तिला विशिष्ट चव आणि सुवास मिळतो. तिची चव किंचित गोडसर असते. ती थेट प्यायली जाते किंवा विविध कॉकटेलमध्ये वापरण्यात येते.

महत्वाचे म्हणजे, या निर्णयामुळे भारतात बॉर्बन व्हिस्कीची किंमत तुलनेने कमी होणार आहे. भारतातील ग्राहकांना आता परवडणाऱ्या दरात ही व्हिस्की मिळू शकणार आहे. तसेच, यामुळे भारतातील दारू व्यापार आणि हॉटेल उद्योगालाही फायदा होईल.