सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
आषाढी एकादशीसाठी मुख्य पालख्यांचे पंढरपूरकडे प्रस्थान होऊ लागले आहे. आज संत ज्ञानेश्वर माऊलींचे पालखी सातारा जिल्ह्यातील लोणंद येथून पंढरपूरकडे प्रस्थान झाले. मात्र, यंदा आषाढी एकादशीला वारीला परवानगी नाकारण्यात आलेली आहे. तसेच पंढरपुरात संचारबंही करण्यात आली आहे. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबियांनाच पूजेसाठी परवानगी देण्यात आली आहे. या उलट बिगबॉस फेम अभिजित बिचुकले हेही आज साताऱ्यातून पंढरपूरकडे रवाना झाले. जाताना त्यांनी एवढंच सांगितलं कि, “जर भगवंताच्या मनात असेल तर मी दर्शन घेणारच.”
सातारा येथील बिगबॉस फेम म्हणून ओळख असलेल्या अभिजित बिचुकले यांनी आजपासून पंढरपूरला विठूमाऊलींच्या दर्शनास सुरुवात केली. सातारा इथून बिचुकले सकाळी पंढरपूरकडे रवाना झाले. तत्पूर्वी बिचुकले यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंढरपूरला यंदा प्रशासनाने पायी वारीला परवानगी नाकारल्याबद्दल सरकारवर टीका केली.
यावेळी बिचुकले म्हणाले की, राजकीय मेळावे एवढ्या मोठ्या प्रमाणात होत आहेत तर मग पंढरपूरला येणाऱ्या माऊलीच्या दर्शनाला सज्जन अशा वारकऱ्यांना का रोखल आहे? मी तर जाणारच आहे. ब-याच ठिकाणी मला थांबवण्यासाठी नाकाबंदी केली आहे. पण भगवंताच्या मनात असेल तर नक्कीच मी दर्शनाला पोहचणार. परंतु जर चोकोबा (अभिजित बिचुकले ) माऊलीच्या पूजेला नसतील तर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची पुजा यक्षस्वी नाही होणार,” असेही यावेळी बिचुकले यांनी सांगितले.