बिहार झालं आता महाराष्ट्राची बारी! ‘ऑपरेशन कमळ’ नक्कीच फत्ते होणार- नारायण राणे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । बिहार निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील नेत्यांचा आत्मविश्वास सातव्या अस्मानावर पोहोचला आहे. बिहारमध्ये विजय मिळवल्यानंतर राज्यातील भाजप नेते वारंवार राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार असल्याची विधान करत आहेत. अशा वेळी बिहार विजयानंतर आता महाराष्ट्रात ऑपरेशन कमळ नक्की होणार, असा दावा भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी केला आहे.

मात्र, तुर्तास याविषयी अधिक बोलण्यास त्यांनी नकार दिला. लवकरच मी याबद्दल प्रसारमाध्यमांशी सविस्तर बोलेने, असे नारायण राणे यांनी सांगितले. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात नारायण राणे यांच्या बोलण्यात कितपत तथ्य आहे, याविषयी चर्चा सुरु झाली आहे. (BJP leader Narayan Rane give hints about operation lotus in Maharashtra)

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) बहुमत मिळाले होते. या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. बिहार निवडणुकीच्या विजयाचे संपूर्ण श्रेय मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना दिले. मी त्यांचे अभिनंदन करतो. देशातील जनतेच्या सुरक्षिततेची काळजी घेतल्याने आणि त्यांच्या इतर समस्या सोडवल्यामुळे भाजपला बिहारमध्ये विजय मिळाला, असा दावा नारायण राणे यांनी केला.

यावेळी नारायण राणे यांनी राज्य सरकारच्या फटाकेमुक्त दिवाळी या धोरणाचा विरोध केला. दिवाळी हा आमचा आनंद साजरा करण्याचा सण आहे. हा लहान आणि मोठ्यांचा दोघांचाही सण आहे. त्यामुळे राज्य सरकारने फटाके वाजवण्यावर बंदी घालून हा आनंद हिरावून घेऊ नये. माझा फटाकेमुक्त दिवाळीला विरोध आहे, असे नारायण राणे यांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

Leave a Comment