नालंदा । बॉयफ्रेंडचे लग्न झाल्यानंतर रागाने त्याच्या गर्लफ्रेंडने नव्या नवरीच्या डोळ्यांत फेविक्विक टाकले. तसेच तिचे केस कापले. बिहारमधील नालंदा जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली. नालंदामध्ये भयानक घटना घडली आहे. गावकऱ्यांनी तिला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
नालंदा जिल्ह्यातील भागनबिगहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. बॉयफ्रेंडचे लग्न झाल्यानंतर राग अनावर झालेली त्याची गर्लफ्रेंड मंगळवारी रात्री त्यांच्या घरात घुसली. तिने घरात झोपलेल्या नव्या नवरीचे केस कापले. त्यानंतर तिच्या डोळ्यांत फेविक्विक टाकले. त्याचदरम्यान, पीडितीने आरडाओरड केली. तिचा आवाज ऐकून शेजारी धावून आले. त्यांनी आरोपी तरुणीला पकडले आणि बेदम चोप दिला. त्यानंतर तिला पोलिसांच्या हवाली केले. या अचानक झालेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर उपचार सुरु आहेत.
नवरदेवाच्या नातेवाईकांनी सांगितले की, रात्री नवरी खोलीत झोपली होती. मध्यरात्री संबंधित तरूणी तिच्या खोलीत शिरली. आरडाओरड ऐकून आम्ही गेलो. नवविवाहितेची अवस्था पाहून आम्हाला धक्का बसला. त्याचवेळी पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीला पकडून नातेवाईकांनी चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. मारहाणीत ती तरूणी जखमी झाली होती.
हिंदू मुलीशी विवाह करण्यासाठी मुस्लिम युवकाने केलं धर्मांतर, हायकोर्टाच्या आदेशावर पोलिसांनी दिले संरक्षण
वाचा सविस्तर- https://t.co/ZWHySGj1Hb#Hindu #Muslims #LoveJihaad #HelloMaharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) December 2, 2020
मुलगा-मुलगी जन्मासंबंधीच्या वक्तव्यानंतर इंदुरीकर महाराजांचे कोरोनावर मोठं विधान, म्हणाले…
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/QARDgrhD82#indurikarmaharaj @MIndurikar #HelloMaharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) December 2, 2020
राष्ट्रवादीत प्रवेश घेण्याआधी तुम्हाला काय पाहिजे असं विचारण्यात आलं होतं, तेव्हा मी..'', खडसेंचा मोठा खुलासा
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/OKknPXVzGT@NCPspeaks @MumbaiNCP @PawarSpeaks @BJP4Maharashtra #HelloMaharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) December 2, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’