मुंबई । बिहार विधानसभा निवडणुक जिंकल्यावर महाराष्ट्रातील भाजपचा आत्मविश्वास वाढल्याचे भासत आहे. बिहारमधील निवडणूक यशानंतर महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोट्स’ होणार का, अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र भाजप सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावत राहील, असे सांगितले. बिहार व पोटनिवडणुकीतील निकालाने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे, असे प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सांगितले.
माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर आणखी काही भाजप नेते राष्ट्रवादीच्या गळाला लागतील, असा दावा केला जात होता. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नैत्रुत्वात भाजपला केवळ बिहारमध्येच नव्हे तर अन्य राज्यांमधील विधानसभा निवडणुकीतही भरघोस यश मिळाले हे लक्षात घेता भाजप सोेडून जाणे राजकीय शहाणपणाचे होईल का याचा विचार कुंपणावरील नेते नक्कीच करतील, असे म्हटले जात आहे.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे बिहारमध्ये भाजपचे निवडणूक प्रभारी होते. ऐन निवडणुकीच्या काहीच दिवस आधी कोरोनाबाधित झाल्याने त्यांना मुंबईला परतावे लागले तरीही ते सातत्याने तेथील प्रचार रणनीती ठरविण्यात महत्त्वाची भूमिका वठवत होते. बिहारमध्ये भाजपने यश मिळविल्याने फडणवीस यांची पक्षातील उंची वाढेल, असे मानले जाते.
हुर्ररे! आता रब्बी हंगामात सिंचनासाठी दिवसाही वीजपुरवठा होणार; उर्जामंत्र्यांची मोठी घोषणा
वाचा सविस्तर- https://t.co/gBI6cB6dkq@NitinRaut_INC #electric #Farmers #HelloMaharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 12, 2020
पदवीधर-शिक्षक मतदारसंघ निवडणूक: उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस! हे उमेदवार रिंगणात
वाचा सविस्तर- https://t.co/EypRymMRmg#HelloMaharashtra #politics #politicalnews— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 12, 2020
Big Breaking News
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा! येत्या २ दिवसांत नुकसान भरपाईचे पैसे खात्यात जमा होणार
वाचा सविस्तर- https://t.co/XpoI3mgKK2#maharashtrarains #farmers #fluids #HelloMaharashtra @CMOMaharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 12, 2020
ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in