मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आयपीएलमुळे अनेक क्रिकेटपटूंनी आपले करिअर घडवले आहे. या लीगमुळे अनेक खेळाडूंना आपली एक वेगळी ओळख निर्माण करता आली. तसेच या लीगमधून अनेक खेळाडू करोडपतीसुद्धा झाले. मात्र बिहारचा रमेश कुमार (Ramesh Kumar) आयपीएलमुळेच एका रात्रीत कोट्यवधींचा मालक बनला आहे. यामध्ये सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे रमेश कुमार (Ramesh Kumar) आयपीएल न खेळताच करोडपती बनला आहे.
काय आहे प्रकरण ?
आयपीएल ही जगातली सगळ्यात जास्त पाहिली जाणारी क्रिकेट लीग आहे. यंदाच्या सीझनमध्ये अनेक रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. तसेच अनेक धक्कादायक निकालसुद्धा समोर आले आहेत. मात्र यादरम्यान बिहारच्या सारण जिल्ह्यात राहणाऱ्या रमेश कुमारचं आयुष्य या आयपीएलमुळे एका रात्रीमध्ये बदललं आहे.
रमेश कुमार (Ramesh Kumar) याने ड्रीम इलेव्हनवर टीम लावून 2 कोटी रुपये जिंकले आहेत. ड्रीम इलेव्हन हे एक बेटिंग अॅप आहे. यामध्ये आपण आपल्या मनाने खेळाडू निवडून त्याच्यावर पैसे लावू शकतो. रमेशने ड्रीम इलेव्हनवर पंजाब किंग्सची टीम लावली आणि कागिसो रबाडाला कर्णधार तसंच शिखर धवनला उपकर्णधार केलं. मॅच संपल्यानंतर रमेशची टीम संपूर्ण देशात नंबरवर ट्रेंड करत होती. त्यानंतर रमेशने एका रात्रीत 2 कोटी रुपये जिंकले. 2 कोटी रुपये जिंकताच रमेशच्या कुटुंबाने मोठ्या प्रमाणात जल्लोष केला.
हे पण वाचा
PM Kisan : शेतकऱ्यांना 11वा हप्ता मिळण्यास होतो आहे उशीर
फक्त 82 रुपयांमध्ये Vi युझर्सना पाहता येणार अनलिमिटेड वेबसीरीज-मुव्हीज
E-Commerce : खुशखबर !!! ‘या’ सरकारी वेबसाइटवर स्वस्त दरात खरेदीची संधी
कट मारून जाणे बेतले जीवावर, ट्रकखाली चिरडून बाइकस्वाराचा मृत्यू