व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

पुलावरुन बाईक खाली कोसळून अपघात; दोघांचा मृत्यू

कराड : बांधकाम सुरु असलेल्या पुलावरुन बाईक खाली कोसळून दुचाकीस्वारांना प्राण गमवावे लागले, तर एक जण जखमी झाला आहे. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात हा भीषण अपघात झाला. अपघातग्रस्त तरुण हे कोल्हापूर जिल्ह्याचे रहिवासी असल्याची माहिती आहे. बाईकस्वार बांधकाम सुरु असलेल्या पुलावरुन रात्री ट्रिपल सीट जात असल्याची माहिती आहे. (Satara Karad Accident Tripple Seat Kolhapur Bike Riders fall off flyover to death)

अंधारामुळे रस्ता न दिसल्याचा अंदाज

कराड – मलकापूर रोडवरील पुलाचे बांधकाम सुरु असल्याने या रोडवरील वाहतूक बंद आहे. तरीही या पुलावरुन संबंधित बाईकस्वार रात्रीच्या वेळेस ट्रिपल सीट प्रवास करत होते. त्यातच अपघात होऊन बाईक थेट उड्डाणपुलावरुन खाली कोसळली. सातारा जिल्ह्यात कराड चांदोली रोडवर उंडाळे जवळ ही अपघाताची घटना घडली. अंधारामुळे रस्ता न दिसल्याने अपघात झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

कोल्हापुरातील दोघांचा साताऱ्यात मृत्यू

मृत आणि जखमी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील भेंडवडी येथील रहिवासी होते. अपघातात जानु भैरु झोरे आणि कोंडिबा भागोजी पाटने यांना प्राण गमवावे लागले. तर जखमी दगडू बिरू झोरे यांच्यावर कराडमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कराड पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.