हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही दिवसांपूर्वी माजी पाकिस्तानी गोलंदाज शोएब अख्तरने करोनाविरुद्ध लढ्यात निधी उभा करण्यासाठी भारत-पाक क्रिकेट मालिका खेळवण्याचा पर्याय सुचवला होता. या पर्यायाला पाकच्या माजी खेळाडूंनी पाठींबा दर्शवला. परंतु भारतामधील खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंची ही मागणी धुडकावून लावली आहे. माजी खेळाडू सुनिल गावसकर यांनी एकवेळ लाहोरमध्ये बर्फ पडेल, पण भारत-पाक क्रिकेट मालिका सध्या शक्य नाही अशा शब्दांत पाकला टोला लगावला आहे. आयसीसीच्या स्पर्धांमध्ये दोन्ही संघ समोरासमोर येत आहेत तितपर्यंत ठीक आहे पण दोन देशांमध्ये क्रिकेट मालिका सध्याच्या घडीला शक्य नाही असं गावसकर यांनी एका यू-ट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.
सध्या करोनामुळे सर्व क्रीडा स्पर्धा ठप्प झालेल्या आहेत. अशावेळी परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर दुबईसारख्या ठिकाणी दोन्ही संघांमध्ये ३ सामन्यांची मालिका खेळवण्यात यावी. यामधून येणारा निधी हा दोन्ही देशांनी समसमान वापरावा असा पर्याय काही दिवसांपूर्वी शोएब अख्तरने सुचवला होता. मात्र भारतीय खेळाडूंकडून याला अपेक्षित प्रतिसाद आलेला नाही. सुनील गावस्कर यांच्या आधी भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी भारताला पैशाची गरज नसल्याचं म्हटलं होतं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”