हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेच्या हातून ठार मारला गेलेला दहशतवादी ओसामा बिन लादेनच्या मुलाने खळबळजनक खुलासा केला आहे. लादेनने कुत्र्यांवर रासायनिक शस्त्रांंचं परीक्षण केलं होतं अशी माहिती त्याचा मुलगा ओमरने केला आहे. कतार दौऱ्यावर असताना उमरने ‘द सन’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत हा दावा केला आहे.
उमर म्हणाला, त्याचे वडील लादेन त्याला त्याच्या पावलावर पाऊल ठेवण्याचे प्रशिक्षण देत होते. तो लहान असताना त्याला बंदूक चालवण्याचे प्रशिक्षण दिले होते. येव्हडच नव्हे तर लादेनने त्याच्या कुत्र्यांवर रासायनिक शस्त्रांची चाचणी केली होती.आपण पीडित असून वडिलांसोबत घालवलेला वाईट काळ विसरण्याचा प्रयत्न करतोय असेही उमरने सांगितलं.
जतमधील पाणी प्रश्नाबाबत मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा; म्हणाले की …
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/CAHQQZm2Qe#Hellomaharashtra @mieknathshinde
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) December 2, 2022
41 वर्षीय उमर हा व्यवसायाने चित्रकार असून आता तो पत्नी जैनासोबत फ्रान्समध्ये राहतो. खरं तर लादेनने त्याचे काम पुढे घेऊन जाण्यासाठी उमरची निवड केली होती मात्र न्यूयॉर्कमध्ये 11 सप्टेंबर रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या आधीच उमरने अफगाणिस्तान सोडण्याचा निर्णय घेतला होता. वाईट काळ विसरण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न करतो असं त्याने म्हंटल आहे.