Monday, January 30, 2023

आभाळ फाटले : वारणेत महापुराचा धोका; शिराळा तालुक्यात आस्मानी संकट

- Advertisement -

शिराळा प्रतिनिधी । आनंदा सुतार

चांदोली धरण परिसरात धुवाॅधार पाऊस सुरू आहे. गुरुवारी सकाळी आठ ते आज शुक्रवार सकाळी आठ वाजेपर्यंत चोवीस तासांत तब्बल ५७४ मिलिमीटर पाऊस पडला आहे. चांदोली धरण निमिर्ती पासुन आज पर्यतच्या इतिहासातील हा रेकॉर्डब्रेक अतिवृष्ठी पावसामुळे चांदोली धरणाची पाणी पातळी चोविस तासात तब्बल सव्वा पाच मीटरने तर पाणीसाठा ४.५ टीएमसी ने वाढला आहे. आरळा शित्तुर,चरण सोंडोली,बिळाशी भेडसगांव, काखे मांगले,कांदे सावर्डे हे चार पुल व मांगले सावर्डे, शिराळे खुर्द माणगांव,कोकरुड रेठरे हे तीन बंधारे सुद्धा पाण्या खाली गेले असुन शिराळा तसेच शाहुवाडी व पन्हाळा तालुक्याचा जवळचा संर्पक तुटला आहे.

- Advertisement -

मुसळधार पाऊस आणि धरणात होणारी पाण्याची आवक यामुळे धरणातुन पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला असून २४७२० क्युसेक्स एवढा करण्यात आला आहे. वीज निर्मिती केंद्रातून ५१० कयुसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर गेले असून शिराळा तालुक्यात पावसाची परिस्थिती अतिवृष्ठीचीच राहिली तर मात्र महापुर येण्याची शक्यता आहे. आरळा शित्तुर, चरण सोंडोली, बिळाशी, भेडसगांव, काखे मांगले, कांदे सावर्डे हे चार पुल व मांगले सावर्डे, शिराळे खुर्द माणगांव, कोकरुड रेठरे हे तीन बंधारे सुद्धा पाण्या खाली गेले आहेत.

शिराळा तसेच शाहुवाडी व पन्हाळा तालुक्याचा जवळचा संर्पक तुटला आहे. तालुक्यातील मणदूर, सोनवडे, मराठवाडी,काळुद्रे उबाळे वस्ती ,चरण सोंडोली फाटा, मोहरे, शेडगेवाडी, खुजगांव, कोकरुडसह नदीकाठच्या गावामधील अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणची शेती पाण्याखाली गेली आहे. तर आरळा, चरण ,शेडगेवाडी या बाजार पेठेतही पुराचे पाणी शिरले असुन जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर पाण्याचा विसर्ग आणखी वाढविण्यात येणार असल्याचे धरण प्रशासनाकडुन सांगण्यात आले आहे. सध्या धरणाची पाणी पातळी ६२५.५५ मीटर असून धरणात पाणीसाठा ३२.७३ टीएमसी झाला आहे. धरण ९५.१४ टक्के भरले आहे.