हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना विषाणूचे प्रमाण आटोक्यात आले असतानाच आता बर्ड फ्लू मुळे देशभरात चिंतेच वातावरण आहे. बर्ड फ्ल्यूचा आजार हा अत्यंत धोकादायक असून याचा मृत्यूदर हा १० ते १२ टक्के इतका आहे. त्यामुळे राज्यात हायअलर्ट घोषीत करणं गरजेचं असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. जालना येथे आपल्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या बर्ल्ड फ्ल्यूने थैमान घातलं असून महाराष्ट्रातही त्याचा शिरकाव झाला आहे. परभणी जिल्ह्यात शेकडो कावळे या आजारानं मृत्यूमुखी पडले आहेत. सुरुवातीला पक्षांमध्ये संसर्ग होणाऱ्या या आजाराचा मानवी शरिरातही संसर्ग होतो. या आजाराचा मृत्यू दर हा १० ते १२ टक्के आहे. त्यामुळे या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी पशुसंवर्धन आणि आरोग्य विभागाने अलर्ट घोषीत करणं गरजेचं आहे,” असं टोपे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, एएनआयनं दिलेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, परभणी, बीड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीतही बर्ड फ्लूचं असल्याचं निष्पन्न झालं आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’