वाढदिवस विशेष : शरद पवार- देशाच्या राजकारणातील चाणक्य; जाणून घेऊया पवार साहेबांबद्दल बरंच काही….

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वाढदिवस विशेष । अक्षय पाटील

शरद पवार… महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणातील मोठं नाव…. सत्ता कोणाचीही असो वा आमदारांची संख्या कितीही असो.. शरद पवार हे नेहमीच राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिले. .. शरद पवार कधी काय करतील याचा अंदाज बांधणे भल्याभल्यांना जमलं नाही, पण काहीही असलं तरी पवार आपल्यासोबतच असलेले बरे असे विरोधकांनाही वाटत…. आणि हीच तर शरद पवारांच्या आत्तापर्यंतच्या राजकारणाची सर्वात मोठी ताकद आहे…..आज शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया पवार साहेबांबद्दल बरंच काही…

संसदीय राजकीय कारकीर्द-

12 डिसेंबर 1940 रोजी शरद पवार यांचा जन्म झाला. आजपर्यंत तब्बल 50 वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांनी राजकारणाला दिली. 4 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, देशाचे संरक्षण मंत्री, केंद्रीय कृषिमंत्री असा शरद पवारांचा प्रवास त्यांच्यातील मोठेपणा सिद्ध करतो. शरद पवारांच्या मनात नेमकं काय चाललंय याचा अंदाज खुद्द राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही कधी आला नाही. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी असो वा पंतप्रधान नरेंद्र मोदी… सर्वचजण शरद पवारांचा आदर करतात.

पवारांचे राजकीय वजन-

पवारांची राजकीय ताकद कधीही आकड्यांवरून मोजली गेली नाही… म्हणूनच फक्त 4-5 खासदार असले तरी पवारांचे दिल्लीच्या राजकारणातील महत्त्व थोडंही कमी झालं नाही, उलट दिवसेंदिवस पवारांचे राजकीय महत्त्व आणि पावर वाढतच गेली. काहींना तर त्यांच्यावर Phd करावी वाटते पण खरं तर पवार साहेब phd करून सुद्धा न समजणारा विषय आहे. उद्योग, कला, क्रीडा, साहित्य, सहकार, शेती, समाजकारण, राजकारण या सर्वच क्षेत्रातील त्यांना ज्ञान आहे आणि त्यासाठी त्यांचं मोठं योगदान आहे..

राजकारणातील मुरब्बी-

राजकारणातील मुरब्बी’ म्हणून शरद पवारांची ओळख पूर्वीपासून आहे. १९७८मधील पुलोद सरकार बनवतानाच्या घटना असोत, की २०१९मध्ये शिवसेनेला महायुतीतून बाहेर घेऊन, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करणे असो, शरद पवारांनी आत्तापर्यंत तेच केलं जे इतरांना कधीही जमणार नाही. विशेष म्हणजे ज्या वयात आराम करायचा, घरात बसायचे, त्या वयात पवार साहेब महाराष्ट्रभर फिरत आहेत. सगळ्या आव्हानांना उत्साहाने सामोरे गेलेले शरद पवार आपण पाहतो आहोत.

महाराष्ट्राच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर म्हणजे शरद पवार –

लातूरचा भूकंप असेल, महिलांना दिलेलं आरक्षण असुद्या, देशाच्या इतिहासातील पहिली शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी असुद्या, शरद पवारांनी नेहमीच जनतेमध्ये मिसळून लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केलाय. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा प्रश्न असो वा कष्टकऱ्यांचा, फळबागांचा असो वा साखर कारखान्याचा, क्रिकेटचा प्रश्न असो वा कुस्तीचा, पवारांनी प्रत्येक प्रश्न लीलया मार्गी लावला.

भारतीय क्रिकेटला नव्या उंचीवर नेणारे शरद पवार-

राजकारणा व्यतिरीक्त शरद पवारांचे क्रिकेट क्षेत्र देखील आवडीचे आहे. क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदावर पवार साहेब २९ नोव्हेंबर २००५ साली निवडुन आले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदाची सुत्र १ जुलै २०१० ला पवार साहेबांनी स्विकारली. हे पद भुषवणारे ते दुसरे भारतीय ठरले त्यांच्या पुर्वी जगमोहन दालमियांनी हे पद भुषवले होते.