Bitcoin Price : बिटकॉइनने गाठला आतापर्यंतचा उच्चांक, $68 हजार पातळी ओलांडली; Etherium देखील वाढला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । सर्वात मोठ्या क्रिप्टोकरन्सी बिटकॉइनच्या किमतीने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. आज मंगळवारी दुपारी बिटकॉइनने $68 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. ऑक्टोबरमध्ये सुरू झालेली रॅली सुरू ठेवत, तो 68,049 च्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला. बाजारातील या रॅलीमुळे, क्रिप्टोकरन्सीची मार्केट कॅप केवळ एका महिन्यात $1 ट्रिलियन वरून $3 ट्रिलियन झाली आहे.

CoinGecko च्या डेटानुसार, Ether, जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी, $4,800 च्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली आहे. त्यात 2 टक्क्यांहून जास्त वाढ झाली आहे. पूर्वी असे रिपोर्ट्स आले होते की, Etherium नेटवर्कने गेल्या आठवड्यात जारी केलेल्या पेक्षा जास्त कॉईन्स बर्न केले.

Etherium
Etherium च्या जास्त ट्राजेक्शन फीसमुळे Solana आणि Polkadot सारखी टोकन्स लक्ष वेधून घेत आहेत. गेल्या 24 तासांत दोन्ही कॉईन्समध्ये अर्ध्या टक्क्यांहून जास्त वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात Solana 21 टक्क्यांहून अधिकने वाढला आहे.

Cardano
Cardano नेही मंगळवारी सकाळी सुमारे 5 टक्के उडी मारली, गेल्या 7 दिवसांत 10 टक्क्यांहून अधिक. Ripple XRP ने देखील गेल्या आठवड्यात 15% पेक्षा जास्त रॅलीचा आनंद लुटला आहे.

Dogecoin
मंगळवारी सकाळी Dogecoin सुमारे 6% वाढले. यामुळे त्याचा विकली प्रॉफिट 6% झाला. गेल्या काही दिवसांपासून या कॉईन्समध्ये थोडी वाढ झाली आहे. मार्केट कॅपनुसार 11 व्या क्रमांकाचे सर्वात मोठे कॉईन असलेले शिबा इनू देखील 3 टक्क्यांनी वाढले.

भारतात क्रिप्टोकरन्सी
भारत क्रिप्टोकरन्सीच्या संदर्भात मध्यम स्वरूपाचा विचार करत आहे. एका सरकारी सूत्राने सांगितले की,”क्रिप्टोकरन्सीमध्ये भारतीयांची मोठी गुंतवणूक पाहता, क्रिप्टोवर बंदी घालण्याचा कठोर दृष्टिकोन शक्य नाही. तसेच या अनरेग्युलेटेड व्हर्चुअल करन्सीजना लीगल टेंडर म्हणून परवानगी दिली जाण्याची शक्यता नाही. सरकारने व्हर्च्युअल मालमत्तेवरील कायद्याला लवकरात लवकर अंतिम रूप द्यावे जेणेकरुन संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात ते सादर केले जाऊ शकेल.

सूत्रानुसार, कायद्याच्या चौकटीवर लवकरच अंतिम निर्णय घेतला जाईल. सर्व भागधारकांच्या चिंता समतोल राखणारा मधला मार्ग शोधला जाण्याची शक्यता जास्त आहे.

Leave a Comment