नवी दिल्ली । काल मंगळवारी विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर आज Bitcoin च्या किंमतीत घसरण पाहायला मिळत आहे. आज बुधवारी दुपारी एका Bitcoin ची किंमत 66,529 डॉलर्सवर चालू आहे. त्याचप्रमाणे आज ether मध्येही घसरण झाली आहे. दोन्ही क्रिप्टो त्यांच्या उंचीवरून खाली आले आहेत. आज संपूर्ण क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये घसरण दिसून येत आहे. Bitcoin आणि Ether क्रिप्टो या दोन्हींमध्ये जूनपासून दुपटीने वाढ झाली आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून डॉलरच्या तुलनेत सुमारे 70 टक्के वाढ नोंदवली गेली आहे.
गेल्या आठवड्यात 9.5 कोटी डॉलर्सची गुंतवणूक
मार्केट कॅपिटलायझेशननुसार जगातील सर्वात मोठ्या क्रिप्टोकरन्सीमध्ये एक टक्क्यांनी घट झाली आहे. या वर्षी आतापर्यंत त्यात 131 टक्के वाढ झाली आहे. CoinShares च्या डेटानुसार, Bitcoin प्रॉडक्ट्स आणि निधीमध्ये 6.4 बिलियन पर्यंतची विक्रमी गुंतवणूक झाली आहे. गेल्या आठवड्यात यात 9.5 कोटी डॉलर्सची गुंतवणूक झाली.
Ether 1 टक्क्यांनी खाली
त्याच वेळी, दुसरी सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी Ethereum म्हणजेच Ether मध्ये 1 टक्क्यांची घसरण होत आहे आणि ती 4,747 डॉलर्सवर दिसत आहे. Bitcoin च्या वाढीसह, Ether मध्ये वाढ झाली. Dogecoin ची किंमत 3 टक्क्यांनी घसरून 0.27 डॉलर्सवर आली आहे. Shiba Inu देखील 3 टक्क्यांनी घसरून 0.000054 डॉलर्सवर आला आहे. त्याचप्रमाणे XRP, Polkadot, Solana मध्येही घसरण झाली आहे.
Cardano 6 टक्क्यांनी वाढून 2.25 डॉलर्सवर
मात्र, Cardano 6 टक्क्यांनी वाढून 2.25 डॉलर्सवर दिसत आहे. Litecoin 7 टक्क्यांनी वाढून 260.69 डॉलर्सवर ट्रेड करत आहे. Bitcoin चा प्रवास अनेक चढ-उतारांनी भरलेला आहे. जुलैमध्ये ही क्रिप्टोकरन्सी 30,000 डॉलर्सच्या खाली गेली. यानंतर त्यात रिकव्हरी दिसून आली. ऑक्टोबर महिन्यात तो उच्चांकी पातळीवर पोहोचला.
Bitcoin आणि Ethereum या दोन्ही क्रिप्टोकरन्सी ऑक्टोबरपासून डॉलर्सच्या तुलनेत 70 टक्क्यांनी जास्त रिटर्न देत आहेत. Bitcoin आणि इतर करन्सीमध्ये तेजी ऑक्टोबर महिन्यापासून सुरू झाली. गेल्या महिन्यात यूएस मध्ये क्रिप्टोकरन्सीचे एक्सचेंज-ट्रेडेड फंड (ETFs) लाँच केल्यानंतर त्यांच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ झाली आहे. हे पहिले Bitcoin ETF लाँच केले गेले.