कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
केंद्र सरकारने इम्पेरिकल डेटा न दिल्याने आरक्षण गेले आहे. आमच्यावर परिस्थिती गंभीर निर्माण झाली असून राज्य सरकारने दिलेला अहवाल हा संतापजनक आहे. ज्यांनी आरक्षण घालवले तो भाजप आणि आमचा राष्ट्रीय काॅंग्रेस पक्ष ओबीसी आरक्षणासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. आमच्याच सरकारमधील घटक पक्ष राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि शिवसेना हे ओबीसी आरक्षणासाठी प्रयत्न करताना दिसत नसल्याचा आरोप ओबीसी सेल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी केला आहे.
कराड येथे आज आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक अशोकराव पाटील, प्रदेश सरचिटणी धैर्यशील सुपले, प्रदेश सचिव बबनराव पुजारी, जग्गनात कुंभार, आनंदा सावंत, शिवाजीराव गावडे, भिमराव काळोख, बाबूराव मोटे, दत्तात्रय काशिद, सचिन जगताप, शिवराम शिंदे, रतन बाड, सागर कुंभार, सुनिल उबाळे आदी उपस्थित होते.
भानुदास माळी म्हणाले, आम्ही रत्नागिरी, पुणे येथे रस्त्यावर उतरून आंदोलने केली. आम्ही नाशिक, विदर्भात आम्ही मोर्चे काढणार आहोत. राष्ट्रपतींना भेटणे रस्त्यावर उतरून आंदोलन करणे एवढाच पर्याय आमच्यापुढे आहे. आमच्यावर अन्याय झाला आहे. यापुढील लढाई रस्त्यावर असणार आहे. पुण्यातील मोर्चाला राहूल गांधी यांच्या उपस्थित 1 लाख लोकांच्या साक्षीने काढला जाईल.