भाजपाकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर; पंतप्रधान मोदी वाराणसीतून लढणार

Loksabha Election 2024
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी लोकसभा निवडणुका (Loksabha Election 2024) तोंडावर आल्या असताना भाजपकडून उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 2024 ची लोकसभा निवडणूक वाराणसीतून लढणार आहेत. आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून भाजपकडून 16 राज्यातील 195 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. या पहिल्या यादीत भाजपने 34 केंद्रीय मंत्र्यांना उमेदवारी दिल्याचे दिसत आहे.

याबरोबरच भाजपने 16 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधील तब्बल 195 जागांचा निर्णय झाला असल्याची देखील माहिती दिली आहे. तसेच, केंद्रीय व राज्य मंत्री ही निवडणूक लढतील असे देखील सांगितले आहे. मुख्य म्हणजे लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी येथून उभे राहणार आहेत. भाजपच्या यादीत एक लोकसभा अध्यक्ष आणि दोन माजी मुख्यमंत्री यांची देखील नावे आहेत. यामध्ये 28 महिलांचा समावेश आहे. भाजपच्या यादीनुसार अनुसूचित जातीचे 27, अनुसूचित जमातीचे 18, ओबीसी 56 उमेदवार असणार आहेत.

दरम्यान भाजपने आपल्या पहिल्या यादीमध्ये महाराष्ट्राचा समावेश केलेला नाही. त्यामुळे भाजपकडून महाराष्ट्रामध्ये कोणत्या जागांसाठी कोणता उमेदवार असेल याबाबत मोठी उत्सुकता लागून राहिली आहे. यावेळी भाजपने फक्त नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासह 34 केंद्रीय मंत्र्यांची उमेदवारी जाहीर केली आहे. या यादीमध्ये महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराला स्थान देण्यात आलेले नाही.