हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रश्नम या संस्थेनं आपल्या त्रैमासिक अहवाल नुकताच जाहीर केला असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत प्रथम क्रमांक आला आहे. एकूण 13 राज्यांमधून केलेल्या या सर्वेक्षणात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नंबर वन ठरले आहे. दरम्यान यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींना टोला लगावला आहे.
याबाबत अतुल भातखळकर यांनी ट्विट करत म्हंटल की, उद्धव ठाकरे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री असतील तर, वाझे हे टॉलस्टॉय आणि राहुल गांधी आजच्या युगातले तेनाली रामन असावेत. असा जोरदार टोला अतुल भातखळकर यांनी लगावला.
उद्धव ठाकरे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री असतील तर, वाझे हे टॉलस्टॉय आणि राहुल गांधी आजच्या युगातले तेनाली रामन असावेत… pic.twitter.com/MzDbko7SG1
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 15, 2021
दरम्यान या सर्वेक्षणात सर्वाधिक पसंती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मिळाली असून उद्धव ठाकरे यांची कामगिरी 49 टक्के मतदारांनी चांगली असल्याचं मत नोंदवलं आहे. त्यांच्यापाठोपाठ मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना 44 टक्के मतं मिळाली आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत असून त्यांना 40 टक्के मतं मिळाली आहेत.