हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने मुंबईतील वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये 30 जणांचे बळी घेतले. एकूण 11 ठिकाणी घरे, घरांच्या भिंती, दरड किंवा संरक्षक भिंत कोसळण्याच्या घटना घडल्या. मुसळधार पावसाच्या रेट्यामुळे चेंबूरच्या आरसीएफ परिसरातील भारत नगरमध्ये एका घटनेत दरड तर दुसऱ्या घटनेत संरक्षक भिंत घरांवर कोसळली.
या घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनास्थळी जाऊन भेट न देण्यावरुन भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी निशाणा साधला आहे. मुंबईत २५ लोक पावसामुळे मेले तरी मुख्यमंत्री महोदय घर सोडायला तयार नाहीत, हात टेकले यांच्यासमोर..,” अशी टीका त्यांनी ट्वीट करत केली आहे.
मुंबईत २५ लोक पावसामुळे मेले तरी मा.मुख्यमंत्री महोदय घर सोडायला तयार नाहीत, हात टेकले यांच्यासमोर..@OfficeofUT pic.twitter.com/3b0dkBHZlc
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 18, 2021
दरम्यान, पावसाने मुंबईकरांना अक्षरशः झोडपले आहे. मुंबईच्या सर्वच भागांत अतिमुसळधार पाऊस कोसळला, तर काही भागांत अतिवृष्टी झाली. मध्यरात्री दीड ते दोन तासांत अनेक भागांत २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस कोसळल्याची नोंद करण्यात आली. दरम्यान, मुंबई, ठाणे, पालघर येथे काही ठिकाणी सोमवारी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.