हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| संपूर्ण देशभरामध्ये लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) लगबग सुरू आहे. यात विविध मतदारसंघातून उमेदवार अर्ज करताना दिसत आहेत. परंतु सुरत लोकसभा मतदारसंघात (Surat Constituency) मतदानापूर्वीच भाजपच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. मुकेश दलाल (Mukesh Dalal) असे भाजपच्या या उमेदवाराचे नाव असून ते बिनविरोधी सुरत मतदारसंघातून जिंकून आले आहेत. त्यामुळे सध्या त्यांच्यावर शुभेच्छांचा पाऊस पडत आहे. तसेच हे कसे शक्य झाले? याबाबत देखील प्रश्न विचारले जात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरत मतदारसंघांमध्ये आठही उमेदवारांनी उमेदवारीचा अर्ज मागे घेतल्यामुळे मुकेश दलाल यांचा बिनविरोधी विजय झाला आहे. खरे तर, गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरत लोकसभा मतदारसंघांमध्ये राजकीय ड्रामा सुरू होता. कारण, भाजपने काँग्रेसचा उमेदवार नीलेश कुंभानी यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप नोंदवला होता. या संदर्भातच रविवारी झालेल्या सुनावणीत नीलेश कुंभानी यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आला.
तर दुसऱ्या बाजूला आज बसपचे उमेदवार प्यारेलाल यांनी देखील आपला उमेदवारीचा अर्ज मागे घेतला. यांच्याबरोबर इतर उमेदवारांकडून देखील उमेदवारीचा अर्ज मागे घेण्यात आला. त्यामुळेच आता सुरत मतदारसंघांमध्ये मुकेश दलाल बिनविरोधी विजय घोषित झाले आहे. याबाबत अधिकृत घोषणाही करण्यात आली आहे. दरम्यान, सुरत मतदारसंघात एकूण दहा उमेदवारांनी लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरला होता. यात काँग्रेसच्या एका उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात आला. तर बसच्या उमेदवाराने ही आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे या जागेसाठी भाजपच्या मुकेश दलाल यांचा विजय निश्चित झाला आहे.