हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : आमची लढाई हि काय कानडी भाषिकांशी नाही. बेळगाव मतदार संघात भाजप उमेदवाराबाबत सांघायच झालं तर इथला उमेदवार हा संकटात आहे. इतर पक्षातील नेते या ठिकाणी आले नाहीत असे काहींना वाटत असेल. पण त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी कि शिवसेना व सर्वांच्यावतीने मी या ठिकाणी आलो आहे, असं विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केल.
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीला शिवसेनेने पाठिंबा जाहीर केला आहे. उमेदवाराच्या प्रचारासाठी शिवसेना खासदार संजय राऊत बेळगावला नुकतेच दाखल झाले. यावेळी त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला.
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांच्या प्रचारासाठी शिवसेना नेते संजय राऊत हे थोड्याच वेळात जाहीर सभा घेणार असून रोड शो करणार आहेत. संजय राऊत बुधवारी साडेचार वाजता बेळगावात दाखल झाले. संध्याकाळी रेल्वे फ्लाय ओव्हर ब्रीज जवळ असलेल्या मराठा मंदिर हॉलमध्ये राऊत जाहीर सभेला मार्गदर्शन करणार होते. मात्र त्यांच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली. खासदार संजय राऊत हे दोन दिवस बेळगाव येथे राहणार आहेत.