लायकीप्रमाणे दावा करावा, त्यामुळे चंद्रकांत दादांवर सव्वा रूपयांचा दावा : संजय राऊत

sanjay raut chandrakant patil

मुंबई | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पत्र लिहिले आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांच्यावर कायदेशीर नोटीस बजावणार असल्याचा इशारा दिला आहे. लोक 100 किंवा 150 कोटींचा दावा दाखल करतात. परंतु ज्याची लायकी जेवढी तेवढाच दावा करावा. त्यामुळे मी चंद्रकांत पाटील यांच्यावर सव्वा रुपयाचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे राऊत … Read more

भाजपाकडून राज्यपाल दबावात असून त्यांचा राजकीय प्यादे म्हणून वापर : संजय राऊत

raut bhagatsinh koshyari

मुंबई | राज्याचे राज्यपाल सदवर्तनी, सुस्वाभावी, प्रेमळ व मनमिळावू आहेत. परंतु त्यांनी 12 आमदारांबाबत जी भूमिका घेतली आहे ती राजकीय आहे. त्यांची भूमिका मनापासून नाही, त्याच्यावर नेमणूक झालेल्या पक्षांकडून राजकीय दबावात ते काम करत आहेत. परंतु राजभवानात बसलेल्या व्यक्तीने स्वतःला राजकीय प्यादे म्हणून वापरायला देवून नये. घटनात्मक पदाचे आवमूल्यन होत आहे. हायकोर्टाने काल प्रत्यक्ष नसला … Read more

बेडकाने कितीही फुगण्याचा प्रयत्न केला तरी बैल होत नाही, आशिष शेलारांची राऊतांवर टीका

Ashish Shelar & Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप व शिवसेना पक्षातील नेत्यांमध्ये सध्या जोरदार टीकास्त्र सुरु आहे. ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण तर कधी एखादी दुर्घटना घडली कि त्यावरून भाजपच्या नेत्यांकडून शिवसेनेच्या नेत्यांवर आरोप केले जातात. आज पिंपरी चिंचवड महापालिकेत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विश्वास व्यक्त केल्यानंतर यावर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी राऊतांवर टीका केली. बेडकाने कितीही … Read more

आता राज्यसरकारवर ही राऊतजी खटला भरणार आहेत का ? चित्रा वाघ यांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू झाला नसल्याचे केंद्र सरकारने लेखी सांगितले. त्यानंतर केंद्र सरकार भ्रमिष्ट असल्यासारखे वागत आहे, अशी टीका राऊत यांनी केली आहे. राऊत यांच्या टीकेला भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर देत टीका केली आहे. “महाराष्ट्र सरकारने मे महीन्यात उच्च न्यायालयात एकही मृत्यू ऑक्सीजन अभावी राज्यात झाला नाही … Read more

मराठा आरक्षणाचा मुद्दा सभागृहात उपस्थित व्हावा, अशी तिन्ही पक्षांची मागणी – अशोक चव्हाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा समाजातील आरक्षण मागणीसाठी राज्यभरात राज्य सरकारच्या विरोधात मराठा समाजातील समाजबांधवांमध्ये संतापाची लाट पसरली होती. त्यामुळे राज्य सरकारच्यावतीने केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. याविषयी दिल्लीला गेलेले मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले की, “आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा उठवली तरच फायदा होईल. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा … Read more

… तर मग केंद्र सरकारविरोधात खटला दाखल करा – संजय राऊत यांचा हल्लाबोल

modi raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच ऑक्सीजन अभावीही काही लोकांना आपला जीव गमवावा लागला. अशा परिस्थितीत ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू झाला नसल्याचे केंद्र सरकारने लेखी सांगितल्यामुळे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. संताप व्यक्त करताना राऊत यांनी म्हंटलंय की, केंद्र सरकार सत्यापासून दूर पळत आहे. केंद्र … Read more

शरद पवार आणि शिवसेना एकत्र असल्याने भाजप सत्तेबाहेर : राऊतांचा टोला

Sharad Pawar & Udhav Thakary

मुंबई | शरद पवार राजकारणातील मोठे नेते आहेत. त्याच्याकडून लोक मार्गदर्शन घेत असतात, तसेच चर्चाही करत असतात. शरद पवार आणि शिवसेना एकत्र असल्याने भाजप सत्तेबाहेर आहेत. त्यांचे दुः ख मी समजू शकतो असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपाला लावलेला आहे. संजय राऊत म्हणाले, आजच्या बैठकीत महत्वाचे काही नाही, विरोधकांची मोट म्हणत आहात, त्यामध्ये … Read more

आमच्या पोटात दुखतंय, हे त्यांना कळतंय कारण ते डॉक्टर नाहीत तर कंपाउंडर आहेत : चंद्रकांत पाटलांचा राऊतांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी रविवार थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्रं लिहिले. सरनाईक यांनी लिहलेल्या पत्रानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे. मुख्यमंत्र्याना सरनाईक यांनी लिहलेल्या पत्रातील दाव्याबद्दल खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या प्रतिक्रियानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी राऊत यांना टोला लगावला. आमच्या पोटात दुखतंय, आम्हाला झोप लागत … Read more

प्रताप सरनाईक यांच्या लेटरबॉम्बबद्दल संजय राऊतांनी दिली ‘हि’ प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी रविवार थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्रं लिहिले. सरनाईक यांनी लिहलेल्या पत्रानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे. मुख्यमंत्र्याना सरनाईक यांनी लिहलेल्या पत्रातील दाव्याबद्दल खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “सरनाईक यांच्या पत्राबाबत सर्वांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे,” अशी पहिली प्रतिक्रिया राऊत यांनी दिली आहे. … Read more

शिवसेनेची विचारधारा चंचल झालीय : प्रवीण दरेकरांचे राऊतांना प्रतिउत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राजकारणाबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी रविवारी एक विधान केले होते. राजकारनातील नेते हे चंचल असतात. तसेच चंचल राजकारणात कोणीही कोणासोबत जाऊ शकते, असे म्हणत राऊत यांनी भाजपवरही टीका केली होती. त्यांच्या या टीकेला भाजपनेते विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिउत्तर दिले आहे. “राऊत म्हणतात असे काहीही नसून उलट शिवसेनेची विचारधारांचे … Read more