पाठीत खंजीर खुपसणारा दुसरा चेहरा म्हणजे उद्धव ठाकरे; चंद्रकांत पाटलांचा घणाघात

uddhav thackarey chandrakant patil
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून भाजप आणि शिवसेनेतील दरी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. राज्यात पाठीत खंजीर खुपसणारे उद्धव ठाकरे हे दुसरा चेहरा आहे असं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं.

पाठीत खंजीर खुपसणारा चेहरा असे म्हटले की पूर्वी महाराष्ट्रात एकच चेहरा समोर यायचा, आता मात्र दुसरा चेहराही समोर येतो, तो कोणाचा?, उद्धव ठाकरेंचा अशा शब्दांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर घणाघाची हल्लाबोल केला. तसेच पहिला चेहरा कोणाचा अस म्हणताच उपस्थितानी शरद पवार यांचे नाव घेतलं.

दरम्यान, यापुढे आपल्याला कोणासोबत युती नको. काही प्रामाणिक पक्ष आपल्यासोबत आहेत. आरपीआय, रयत क्रांती संघटना, महादेव जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष, विनायक मेटेंचा शिवसंग्राम आपल्यासोबत आहेत. अजून काही छोटे-छोटे पक्ष आपल्यासोबत यायचं म्हणत आहेत. पण हे नाव मोठं आणि लक्षण खोटं आता नको अशी जळजळीत टीका चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर केली आहे.